नाशिक : माळेगाव साखर कारखान्यावर वर्चस्वासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे या दोघांच्या पॅनेलमध्येच टफ फाईट आहे. या दोघांच्या टफ फाईट मध्ये बारामतीचे सर्वेसर्वा मानले गेलेले शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे स्थानिक राजकारणात तरी पराभवाच्या छायेत आलेत. तिथे आज मतदान होत आहे.A “tough fight” between Ajitdada and Chandrarao Taware for dominance over Malegaon factory
एरवी अखंड राष्ट्रवादी काँग्रेस असताना शरद पवार हेच बारामती तालुक्यातल्या साखर कारखाने आणि सहकारी संस्थांचे सगळे राजकीय भवितव्य ठरवत होते. बारामती तालुक्यातल्या सगळ्या सहकारी संस्थांवर शरद पवारांचे एकहाती वर्चस्व होते. शरद पवार बोले आणि सहकारी संस्था डोले अशी अवस्था सगळ्याच सहकारी संस्थांमध्ये होती.
पण राज्याच्या राजकारणातल्या उलथापालथीने आणि शरद पवारांच्या कारनाम्यांनी टप्प्याटप्प्याने त्यांच्याच वर्चस्वला तडे गेले. आता तर त्यांनीच “राजकीय संस्कार” करून तयार केलेल्या दोन नेत्यांच्या टफ फाईट मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाण्याची भीती शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वाटू लागली. म्हणूनच पवारांनी सुप्रिया सुळे यांना साखर कारखान्याच्या निवडणुकीत थेट उतरविण्याची “रिस्क” घेतली नाही. त्यांनी युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा हे पॅनल निवडणुकीत उतरविले. त्यामुळे पराभव झाला आणि तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, तरी अजित पवारांच्या पुतण्याचा पराभव झाला. आपला किंवा आपल्या मुलीचा पराभव झाला नाही, हे पवारांना दाखविता येणार आहे.
राष्ट्रवादी अखंड असताना देखील माळेगाव साखर कारखान्यावर चंद्रराव तावरे वर्चस्व टिकवून होते. पवार काका – पुतण्यांच्या नेतृत्वांना त्यांनी जुमानले नव्हते. पण 2022 नंतर राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्याच उलथापालथी झाल्या. अजित पवारही भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले. तिथून चंद्ररावांच्या वर्चस्वाला धक्का बसविण्याचे डावपेच सुरू झाले. तरी देखील चंद्रराव बधले नाहीत. त्यांनी सहकार बचाव पॅनल मधून सर्वच्या सर्व उमेदवार उभे केलेच.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला. राज्यातले वेगवेगळे मंत्री वेगवेगळ्या साखर कारखान्याचे चेअरमन झालेत, तर उपमुख्यमंत्री म्हणून मी चेअरमन व्हायला काय हरकत आहे?, असा सवाल त्यांनी केला. पण अजित पवारांना आमदारकी, मंत्री पद, उपमुख्यमंत्री पद, मुख्यमंत्री पद ही सगळीच पदे स्वतःकडे हवीत, असे टीकास्त्र चंद्रराव तावरे यांनी सोडले. याच कालावधीत बारामतीतल्या पीडीसीसी बँकेचे प्रकरण बाहेर आले. रात्री बँक का उघडण्यात आली? पैसे कोणाला वाटण्यात आले?, याविषयी सवाल-जबाब झाले. अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलनी एकमेकांना जास्तीत जास्त एकमेकांनाच “टार्गेट” केले केले. त्या दोघांनीही युगेंद्र पवार यांच्या बळीराजा पॅनेलला खिजगणतीतही धरले नाही.
– माळेगाव कारखाना निवडणूक
– मतदार संख्या : 19,651
– मतदान तारीख : 22 जून 2025
– मतमोजणी तारीख : 24 जून 2025
A “tough fight” between Ajitdada and Chandrarao Taware for dominance over Malegaon factory; Sharad Pawar + Supriya Sule in the shadow of defeat in local politics?
महत्वाच्या बातम्या
- Nitish Kumar : बिहार विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार सरकारने घेतला मोठा निर्णय
- Operation Sindhu : ऑपरेशन सिंधू – २९० भारतीय विद्यार्थ्यांची दुसरी तुकडी इराणहून दिल्लीला पोहोचली
- Omar Abdullah : ‘अमेरिका एखाद्या मित्र तोपर्यंतच राहतो, जोपर्यंत…’ ; उमर अब्दुल्लांनी साधला निशाणा
- Israel : इस्रायलने इराणच्या “इस्फहान अणुऊर्जा केंद्रावर” केला मोठा हल्ला