घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी आश्रमशाळेत गोंधळ घालीत बाधित विद्यार्थ्यांना घेऊन घरी पळ काढला. A total of 20 people, including students, were infected with corona at a government ashram school near Bhiwandi
विशेष प्रतिनिधी
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रमशाळेतील १४ मुली ४ मुलांसह अधीक्षक व स्वयंपाकी अशा एकूण २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी आश्रमशाळेत गोंधळ घालीत बाधित विद्यार्थ्यांना घेऊन घरी पळ काढला.सध्या ४७० विद्यार्थी वसतिगृहात राहत आहेत.
त्यामुळे बाधितांची संख्या वाढण्याची भीती लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे.यात आणखी बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सकाळी काही विद्यार्थिनींना खोकला व ताप जाणवू लागल्याने शाळेचे मुख्याध्यापक रवी चौधरी यांनी नजीकच असलेल्या चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ दत्तात्रय धारणे यांना या बाबत कळविले.
A total of 20 people, including students, were infected with corona at a government ashram school near Bhiwandi
महत्त्वाच्या बातम्या
- माजी पत्नीनेच काढली लाज, म्हणाल्या हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान
- दारूचे ठेके देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी घेतली ५०० कोटी रुपये लाच, जुने सहकारी कवी कुमार विश्वास यांचाच आरोप
- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदाराला पोलीसांचा दणका, पोलीस ठाण्यात अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक
- तर, समीर वानखेडे यांच्या थेट नोकरीवरच येणार गदा