• Download App
    मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक टोल प्लाझावर भरधाव 'SUV'ने अनेक गाड्यांना दिली धडक; तिघांचा मृत्यू!|A speeding SUV hit several cars at the Bandra Worli C Link Toll Plaza in Mumbai The death of three

    मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक टोल प्लाझावर भरधाव ‘SUV’ने अनेक गाड्यांना दिली धडक; तिघांचा मृत्यू!

    • एकूण सहा जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: वांद्रे वरळी सी-लिंकवरील टोल प्लाझाजवळ एका वेगवान एसयूव्ही कारने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.A speeding SUV hit several cars at the Bandra Worli C Link Toll Plaza in Mumbai The death of three

    पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री 10.15 च्या सुमारास, टोलनाक्याच्या अगदी 100 मीटर आधी, वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारने मर्सिडीजला धडक दिली.



    यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात कारने टोलच्या रांगेतील इतर अनेक वाहनांना धडक दिली. त्यामुळे टोल नाक्यावर उभ्या असलेल्या सहा वाहनांची समोरासमोर धडक होऊन त्यात बसलेले लोक जखमी झाले. तत्काळ सर्व जखमींना बाहेर काढून जवळच्या भाभा रुग्णालयात पाठवण्यात आले.

    वरिष्ठ पोलिस अधिकारी कृष्णकांत उपाध्याय म्हणाले, ” धडकल्यानंतर एसयूव्ही कारचा वेग आणखी वाढला आणि ती टोल प्लाझावर दोन-तीन अन्य वाहनांनाही धडकली. या अपघातात एकूण सहा वाहनांचे नुकसान झाले. यात नऊ जण जखमी झाले., त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. इतर सहा जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.”

    A speeding SUV hit several cars at the Bandra Worli C Link Toll Plaza in Mumbai The death of three

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना