• Download App
    एक शिवसेना चालणार उद्धव यांच्या नावावर; शिंदे गट चालणार बाळासाहेबांच्या नावावरA Shiv Sena will run in Uddhav's name; The Shinde group will run in the name of Balasaheb

    एक शिवसेना चालणार उद्धव यांच्या नावावर; शिंदे गट चालणार बाळासाहेबांच्या नावावर

    ठाकरे गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” नाव; तर शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” नाव निवडणूक आयोगाकडून जाहीर

    प्रतिनिधी

    मुंबई : अखेर एकाच्या दोन शिवसेना झाल्या. एक शिवसेना चालणार उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना चालणार बाळासाहेबांच्या नावावर!! A Shiv Sena will run in Uddhav’s name; The Shinde group will run in the name of Balasaheb

    केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” असे नाव दिले असून शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” असे नाव दिले आहे!! त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला धगधगती मशाल हे चिन्ह बहाल केले आहे. त्याचबरोबर त्रिशूल आणि गदा ही धार्मिक चिन्हे असल्याचे ठरवून ही दोन्ही चिन्हे निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नाकारली आहेत.

    शिंदे गटाला म्हणजे “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षाला निवडणूक चिन्हाचे तीन पर्याय देण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.

    आज सायंकाळच्या या निकालामुळे, निवडणूक आयोगाचा अंतिम निकाल येईपर्यंत ठाकरे गट म्हणजे “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” या पक्षाला मशाल या चिन्हावर अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी लागणार आहे, तर शिंदे गटाला कोणतेही धार्मिक चिन्ह वगळून तीन पर्याय देऊन त्यातला एक पर्याय निवडणूक आयोग मान्य करणार आहे.

    A Shiv Sena will run in Uddhav’s name; The Shinde group will run in the name of Balasaheb

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रातल्या कौशल्य विकासासाठी दक्षिण कोरियातल्या लर्निंग फॅक्टरी मॉडेलची मदत; अनेक करारांवर स्वाक्षऱ्या!!

    राष्ट्रवादीवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!

    Piyush Goyal : भारताची टॉफी निर्यात 12 वर्षांत 166% वाढली; आर्थिक वर्ष 2026 मध्ये ₹132 कोटींवर, मंत्री पीयूष गोयल यांनी डेटा जारी केला