वृत्तसंस्था
मुंबई : सायबर क्राईमच्या बातम्या आपण दर दिवसाला ऐकतो. सध्याच इतर क्राईम्स पेक्षा सायबर क्राईम हा जास्त वाढला आहे. रोज नवनवीन केसेस आपल्याला वाचायला मिळतात. मुंबईमध्ये मध्ये खोटी वीजबिले ऑनलाइन पाठवून लोकांना फसवल्याप्रकरणी झारखंडची राजधानी रांचीतून मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. A sharp rise in cybercrime; Two arrested in Jharkhand for cheating Mumbai by sending fake electricity bills online
4 मार्चला मुंबईमध्ये पोलिसांनी दोन जणांना अटक केली. झारखंड मधील रांची येथील वीरेंद्र अशोक लोहरा आणि उमेश परमेश्वर साव या दोघांना सेवरी पोलिसांनी अटक केली. या दोघांनी ऑनलाइन वीजबिले भरण्यासाठी बनावट लिंक पाठवल्या. ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची धमकी देत, ते ग्राहकांची फसवणूक करत होते. ग्राहकांना फोन करून तुमचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे तुमचे वीज कनेक्शन कापण्यात येत आहे. ही कारवाई थांबवण्यासाठी त्वरित बिल भरा, अशी धमकी ते देत होते. त्यानंतर वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईलवरून sms द्वारे एक बनावट लिंक पाठवून त्यावर त्वरित पैसे भरा असे सांगत होते. अशाप्रकारे या दोघांनी अनेकांची फसवणूक केल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दोघांना रांची येथून अटक केली असून दोघांनी लोक लोकांकडून नेमके किती पैसे उकळले याचा तपास शिवडी पोलीस करत आहेत. तसेच अशा धमक्यांना घाबरून नागरिकांनी बनावट लिंक वर क्लिक करू नये. अशा लिंकची निश्चितपणे खात्री करून घेऊनच गोष्टी कराव्यात, असे मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
A sharp rise in cybercrime; Two arrested in Jharkhand for cheating Mumbai by sending fake electricity bills online
महत्वाच्या बातम्या
- UNHRC : काश्मीर, दहशतवाद आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचारांवरून भारताने पाकिस्तानला फटाकरलं!
- सहा महिन्यांपूर्वी मिळाला शांततेचा नोबेल, आता 10 वर्षांचा तुरुंगवास, बेलारुसमध्ये एलेस यांना कोर्टाने ठरवले दोषी
- राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये केले चीनचे कौतुक : म्हणाले- चीन हा शांतताप्रिय देश आहे, तिथले सरकार कॉर्पोरेशनसारखे काम करते
- केंब्रिजमध्ये भारताची निंदा करून राहुल गांधींची अफाट चीन स्तुती!!; हेमंत विश्वशर्मांची सणसणीत चपराकी उत्तरे