• Download App
    पवार सांगतात तसेच जरांगे वागतात; जरांगेंच्या आधीच्याच समर्थक महिलेचा गंभीर आरोप!! A serious allegation by a woman supporter of Jarange

    पवार सांगतात तसेच जरांगे वागतात; जरांगेंच्या आधीच्याच समर्थक महिलेचा गंभीर आरोप!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आरक्षण आंदोलन गेल्या कित्येक वर्षांपासून चालू असताना गेल्या काही दिवसांमध्येच आंदोलनाच्या विशिष्ट टप्प्यावर त्या आंदोलनाचे एकमुखी नेते बनलेल्या मनोज जरांगे यांना आता त्यांच्याच सहकाऱ्यांनी घेरले आहे. किंबहुना जरांगे यांच्या प्रामाणिकतेवरच त्यांनी ठळक प्रश्नचिन्ह लावले आहे. A serious allegation by a woman supporter of Jarange

    जरांगे यांचे आधीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर गुप्त बैठका घेऊन मराठा आरक्षणात खोडा घातल्याचा आरोप केलाच होता. त्यांच्या पाठोपाठ जरांगे यांच्या आधीच्या समर्थक संगीता वानखेडे यांनी देखील जरांगेंवर असेच गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यामुळे जरांगे यांच्या एकमुखी नेतृत्वाला धक्का बसला असून त्यांच्या विश्वासार्हते विषयी ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    शरद पवार सांगतात तसेच मनोज जरांगे वागतात, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला. मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक टप्प्यावर असतानाच आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर आरोपांच्या तोफा टाकल्या गेल्याने जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल महाराष्ट्रात मोठी शंका उपस्थित झाली आहे.

    पवारांचा जरांगेंना फोन

    शरद पवार यांचाच फोन मनोज जरांगे यांना येत होता. मराठ्यांना आरक्षण मिळत होते. म्हणून अनेक गोष्टींकडे काणाडोळा केला गेला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी लावले होते. टोपी घालून मनोज जरांगे अख्खे पुणे फिरले. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे वागतात. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी पवार आणि मनोज जरांगे यांच्यावर केला.

    जरांगेंच्या आंदोलनाचे बोर्ड देखील पवारांच्याच राष्ट्रवादीने लावले. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच जरांगे समर्थकांनी गाव बंदीतून वगळले. बाकी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना गावबंदी आणि पवारांच्या पक्षाच्या नेत्यांना गावबंदी नाही हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिल्याचे संगीता वानखेडे म्हणाल्या.

    आधी त्यांच्या बाजूने, पण आता

    मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेड बनवलं. तिथे अंतरवलीत दंगल घडली का घडवली गेली?, सरकारने शोध लावावा. मनोज जरांगे कोण हे मिडीयाला सुद्धा माहिती नव्हते. मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केले होते. तेव्हा ते लोकं मला गलिच्छ भाषेत बोलत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. मी त्यांचा विरोध करतेय, असे त्या म्हणाल्या.

    वानखेडे यांचे जरांगेंवर आरोप

    पण आता एक ते दीड महिन्यांपासून मी मनोज जरांगे यांचा विरोध करत आहे. विष बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसतेय. मनोज जरांगे बाकी कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्यांचा येत होता, त्यांना मनोज जरांगे विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवारांचा होता, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला.

    A serious allegation by a woman supporter of Jarange

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!