विशेष प्रतिनिधी
पुणे : नुकताच पुण्यामध्ये एका वरिष्ठ पत्रकारांनी आपल्या घरामध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. राजेंद्र येवलेकर असे त्यांचे नाव आहे. ते कोथरूडमध्ये राहत होते. मंगळवारी दुपारी त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त पोलिसांकडून कळते आहे. राजेंद्र येवलेकर हे एका लीडिंग मराठी वृत्त पत्रासोबत काम करत होते. ते सब इडिटर म्हणून काम करायचे. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीविषयी बरेच लिखाण केलेले होते.
A senior journalist committed suicide at his residence in Pune
मंगळवारी दुपारी येवलेकर यांची पत्नी जेव्हा घरी परतली तेव्हा त्यांनी आपल्या पतीचा मृतदेह पहिला. तातडीने त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना कळवले. तेथून त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. असे कोथरूड पोलिस स्टेशनलाचे सीनियर इन्स्पेक्टर महेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली.
जगताप यांनी आणखी माहिती देताना सांगितले की, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाहीये. येवलेकर यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
A senior journalist committed suicide at his residence in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी