• Download App
    सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन विधानभवन बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन! A proposal to build a new Vidhan Bhavan in Maharashtra on the lines of Central Vista is under consideration Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar

    सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन विधानभवन बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन!

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली माहिती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबईत नवीन विधानभवन बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी सांगितले.  A proposal to build a new Vidhan Bhavan in Maharashtra on the lines of Central Vista is under consideration Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar

    नार्वेकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, परिसीमनानंतर राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेच्या जागांची संख्या मतदारांच्या वाढीच्या प्रमाणात असेल. “सेंट्रल व्हिस्टा अंतर्गत परिसीमनातून सदस्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज घेऊन, लोकसभा आणि राज्यसभेसाठी नवीन सभागृहे तयार करण्यात आली.” असे ते म्हणाले. याचबरोबर, महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेसाठीही असेच नवीन विधान भवनाचे बांधकाम व्हावे, अशी माझी इच्छा आहे. मला आशा आहे की प्रस्ताव पुढे नेण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होईल. असे नार्वेकरांनी सांगितले.

    तसेच, एकदा परिसीमन प्रक्रिया पूर्ण झाली की, मतदारांच्या वाढीच्या प्रमाणात आमदार आणि विधान परिषद सदस्यांची संख्या वाढणे अपेक्षित आहे. असे झाले तर त्यांना बसण्यासाठी सध्याच्या सभागृहात  पुरेशा जागा राहणार नाहीत. अशाप्रकारे, महाराष्ट्रासाठी नवीन विधानसभा आणि विधानपरिषद निर्मितीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

    A proposal to build a new Vidhan Bhavan in Maharashtra on the lines of Central Vista is under consideration Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस