• Download App
    A proper house was built for his grandmother, Shrikant Shinde received abundant blessings!! आजीला बांधून दिले हक्काचे घर, श्रीकांत शिंदेंना मिळाले भरभरून आशीर्वाद!!

    आजीला बांधून दिले हक्काचे घर, श्रीकांत शिंदेंना मिळाले भरभरून आशीर्वाद!!

    Shrikant Shinde

    विशेष प्रतिनिधी

    हदगाव : आजीला बांधून दिले हक्काचे घर; खासदार श्रीकांत शिंदेंना मिळाले भरभरून आशीर्वाद!!, ही घटना हदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत घडली. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः हा अनुभव सोशल मीडिया हँडल वरून शेअर केला.A proper house was built for his grandmother, Shrikant Shinde received abundant blessings!!

    तो अनुभव असा :

    सुमारे अडीच वर्षांपूर्वी नांदेडमधील जाहीर सभेत एक आजीबाई आपला वृद्ध देह सावरत माझ्याजवळ येऊन उभ्या राहिल्या. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, हे लक्षात येऊन मी त्यांच्याजवळ गेलो… आपल्या थरथरत्या हातांनी माझा हात धरून त्यांनी अगदी हक्काने एक विनंती केली, “मुला, तू मला माझं स्वतःचं, हक्काचं घर बांधून दे!…” या क्षणी त्यांच्या डोळ्यांतील आशा, विश्वास मला जाणवला. त्यांची ही साधी पण आयुष्यभराची इच्छा पूर्ण करणे, हे माझं कर्तव्यच नव्हे तर माझ्यावरचं त्यांचं ऋण आहे, असं मला वाटलं.



    गेल्या वर्षभरात आवश्यक त्या सर्व प्रक्रिया राबवून शेवटी आजींना त्यांचं हक्काचं पक्कं घर बांधून दिलं. यासर्व प्रक्रियेत आमचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कोहीळीकर यांनी यात विशेष मेहनत घेतली. आणि आजीच्या घराचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण केले.

    गुरुवारी हदगाव येथे प्रचाराच्याच जाहीर सभेत त्या आजी खास माझी भेट घेण्यासाठी आल्या. त्यांनी माझ्या गळ्यात हार घालून, डोक्यावर मायेचा हात फिरवत जेव्हा मन भरून आशीर्वाद दिले… तेव्हा मनात एक भाव दाटून आला. साध्या शब्दात सांगायचं तर, एका लोकप्रतिनिधीच्या जीवनातील हीच खरी कमाई, हीच खरी शाबासकी.

    हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलेलं “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हे तत्त्व आम्ही आजही मनापासून पाळत आहोत. आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्याचे प्रयत्न सातत्याने करत आहोत. आजींना घर मिळालं, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं… हीच या कामाची खरी पोचपावती आहे.

    लोकांच्या अशा आनंदासाठी काम करता येणं हीच माझ्यासाठी लोकसेवेची मोठी परंपरा आणि प्रेरणा आहे. त्यांचा मायेने मिळालेला आशीर्वाद हाच माझ्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाला अधिक समृद्ध करणारा क्षण आहे.

    A proper house was built for his grandmother, Shrikant Shinde received abundant blessings!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Municipal Corporation, : मुंबई मनपात शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत; अमित साटम यांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला, उर्वरित 77 जागांचा लवकरच निर्णय

    Nitin Gadkari, : दरवर्षी 5 लाख रस्ते अपघातांमध्ये 1.8 लाख मृत्यू; सरकार 10 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचवण्याची योजना आणणार

    Chandrashekhar Bawankule : नगर परिषद निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांकावर राहील; महसूलमंत्री बावनकुळे यांचा विश्वास