विमानतळावर लँडिंग आणि टेकऑफ थांबवण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई विमानतळावर एका खासगी जेटला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे विमानतळावर लँडिंग आणि टेकऑफ थांबवण्यात आले आहे. A private jet crashed at Mumbai airport
या अपघातामागची कारणे शोधली जात आहेत. सध्या तेथे बचाव सुरू आहे. या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता 700 मीटर असल्याचे सांगण्यात आले. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. विशाखापट्टणमहून मुंबईला येत असलेल्या VSR Ventures Learjet 45 विमानाचा मुंबई विमानतळावर अपघात झाला. रनवे 27 वर लँडिंग करताना हा अपघात घडला. या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, VT-DBL विमान क्रॅश होताच मुंबई विमानतळावरील उड्डाण वाहतूक बंद करण्यात आली. सध्या सर्व विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ थांबवण्यात आले आहे. धावपट्टी मोकळी करण्याचे काम सुरू आहे. तसेच, मदत आणि बचावासाठी यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. या अपघातामुळे मुंबई विमानतळाची धावपट्टी खराब झाली असून ती दुरुस्त करण्यात येत आहे.
A private jet crashed at Mumbai airport
महत्वाच्या बातम्या
- उज्ज्वला योजनेतून 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन; मोदी सरकारची मोठी भेट
- नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!
- मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून केली हत्या, दोनजण जखमी
- उत्तर प्रदेश : लाचखोर रेल्वे अधिकाऱ्याला CBIने केली अटक, घरात सापडला नोटांचा ढीग, करोडो रुपये जप्त