• Download App
    रुग्णालयात भरती होण्यासाठी पॉझिटीव्ह रिपोर्टची गरज नाही ; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय A positive report is not required for hospitalization

    रुग्णालयात भरती होण्यासाठी पॉझिटीव्ह रिपोर्टची गरज नाही ; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रुग्णालयात भरती होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट जरुरी नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना संशयित रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. A positive report is not required for hospitalization

    देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरु आहे. शनिवारी केंद्र सरकारकडून कोविड 19 उपचारासंदर्भात महत्वाचे बदल केले आहेत. पूर्वी रुग्णालयात भरतीसाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट अथवा सीटी स्कॅनची गरज लागत होती. आता त्याची गरज नाही . यामुळे कोरोना संशयित रुग्णांवर वेळेतच उपचार सुरु होतील.

    रुग्णाणवरील उपचाराला प्राधान्य

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की “कोरोनाचे संशयास्पद प्रकरण आढळल्यास त्याला सीसीसी, डीसीएचसी किंवा डीएचसी वॉर्डमध्ये दाखल केले जाईल. कोणत्याही रुग्णाला सेवेस नकार दिला जाऊ शकत नाही. यामध्ये ऑक्सिजन किंवा आवश्यक औषधे देखील समाविष्ट आहेत, जरी रुग्ण दुसर्‍या शहराचा असला तरी त्याला उपचार नाकारता येणार नाहीत”

    निर्णयाचा मोठा दिलासा

    सध्या देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना संशयित रुग्णांची कोरोना चाचणी अहवाल येण्यासाठी दोन ते आठ दिवसांचा कालावधी लागत आहे. अशात रुग्णांकडे रिपोर्ट नसल्याने रुग्णालयात भरती करुन घेत नव्हते. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे आता अनेकांना दिलासा मिळाला आहे.

    A positive report is not required for hospitalization

    Related posts

    Stray Dog Attacks : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास डॉग फीडर्स जबाबदार; सर्वोच्च न्यायालयाने म्हटले – आमच्या टिप्पण्यांना विनोद समजू नका

    ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा; तिसऱ्या मुंबईतील रायगड – पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक

    New Income Tax Act 2025 : नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार:असेसमेंट वर्षाऐवजी ‘टॅक्स इयर’ येईल, ITR फाइलिंग सोपे; करदात्यांवर काय परिणाम जाणून घ्या