नाशिक : जय पवारच्या लग्नाच्या निमित्ताने जमीन घोटाळ्यातल्या संशयित पार्थ पवारला बहारीनला नेऊन तिथेच सेटल करण्याचा डाव अजित पवारांनी आखला आहे का??, असा सवाल आता तयार झाला आहे. Parth Pawar
एकतर मुंढवा /कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यात केलेल्या FIR मध्ये पार्थ पवारचे नाव नाही. त्याच्या अमेडिया कंपनीचा 1 % भागीदार असणाऱ्या दिग्विजय पाटीलचे FIR मध्ये नाव आहे. त्याची पोलिसांनी चौकशी सुद्धा केली. त्याने आपण पुन्हा पोलिसांनी समोर चौकशीला हजर राहू, पण आपल्याला जय पवारच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी बहारीनला जायचे आहे, असे कारण पोलिसांना सांगितले.
शितल तेजवानीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार या दोघांवरील अटकेची टांगती तलवार आली. Parth Pawar
पण शितल तेजवानी हिच्यावर आधीच वेगवेगळे घोटाळे केल्याचा आरोप आहे. तिला त्या आरोपांमध्ये अडकवून दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार या दोघांना हळूच घोटाळ्याच्या जाळ्यातून बाहेर काढून जय पवारच्या लग्नाच्या निमित्ताने बहारीनला न्यायचे. नंतर टप्प्या टप्प्याने तिथेच सेटल करायचे, असा अजित पवारांचा डाव आहे का??, असा सवाल या निमित्ताने समोर आला आहे.
जय पवारच्या लग्नाला निवडक 400 लोकांना निमंत्रण आहे. पण शरद पवार, प्रतिभाताई पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे बडे नेते त्या लग्नाला हजर राहण्यासाठी बहरीनला जाणार नाहीत. त्यामुळे पार्थ पवारला तिथे नेले आणि हळूहळू तिथे सेटल केले, तरी या कुठल्याच नेत्यांवर थेट त्याचे बालंट येणार नाही.
युगेंद्र पवारचे लग्न मुंबईत बीकेसी मधल्या जिओ सेंटर मध्ये पार पडले. त्या लग्नाला अजित पवार हजर नव्हते. त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे जय पवारच्या लग्नासाठी बहारीनला जाणार नाहीत.
लग्नाभोवती वेगळ्याच “सेटलमेंटचे” जाळे
जय पवारचे लग्न हा आता केवळ पवार कुटुंबीयांचा खासगी सोहळा न राहता, त्याच्याभोवती जमीन घोटाळ्याचे आणि जमीन घोटाळ्यातल्या संशयितांचे आणि आरोपींचे वेगळ्याच “सेटलमेंटचे” जाळे निर्माण झाले.
– अंजली दमानियांना दाट संशय
पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात लक्ष घालणाऱ्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात जाहीरपणे दाट संशय व्यक्त केला. कारण अजित पवारांच्या तशाच राजकीय आणि कौटुंबिक हालचाली त्यांना दिसल्या.
पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विकास खारगे समितीला अहवाल सादर करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली. पार्थ पवार विरुद्ध अजूनही FIR दाखल केला नाही. दिग्विजय पाटील याची पोलिसांनी चौकशी केली, तरी अजून त्याला अटक केली नाही. त्याचबरोबर पार्थ पवारच्या लग्नाला हजर राहण्यासाठी तो बहारीनला जाणार असे सांगितल्यानंतरही पोलिसांनी त्याला प्रतिबंध केला नाही. या सगळ्या हालचाली आणि कारवाया संशयास्पद आहेत. यातून पार्थ पवारला वाचवून बहारीनला सेटल करायचे. त्याला भारतात आणायचेच नाही. त्यामुळे जमीन घोटाळा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने पचवून टाकायचा डाव अजित पवार यांनी आखल्याचे दिसून येते.
A plan to take Parth Pawar to Bahrain and settle him there on the occasion of Jai Pawar’s wedding??
महत्वाच्या बातम्या
- Sheetal Tejwani : शीतल तेजवानीला अखेर अटक; मुंढवा येथील अमेडिया कंपनीच्या व्यवहाराप्रकरणी कारवाई
- गोदावरी वाहणार खळखळ आणि निर्मळ; क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग!!
- पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात शितल तेजवानीला अटक; पार्थ अजून मोकळाच!!
- Pakistan : पाकने श्रीलंकेला एक्सपायर झालेले मदत साहित्य पाठवले; पूरग्रस्तांना पाठवलेल्या फूड पॅकेटचे फोटे व्हायरल