• Download App
    Banks of the Godavari गोदातीरी अंतर्नादचा सुरेल जल्लोष; १७८५ विद्यार्थ्यांच्या भव्य सादरीकरणाने नाशिककर मंत्रमुग्ध!!

    गोदातीरी अंतर्नादचा सुरेल जल्लोष; १७८५ विद्यार्थ्यांच्या भव्य सादरीकरणाने नाशिककर मंत्रमुग्ध!!

    वंदे मातरमच्या १५० व्या स्मरणोत्सवानिमित्त भारतीय शास्त्रीय संगीत,वाद्य आणि नृत्याचा देखणा आविष्कार

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत समिती,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला ‘अंतर्नाद’ हा भारतीय शास्त्रीय संगीत,वाद्य आणि नृत्याचा भव्य कार्यक्रम गोदातीरी उत्साहात पार पडला. सुरेल सादरीकरण, तालबद्ध वाद्यवृंद आणि आकर्षक नृत्याविष्कारामुळे या कार्यक्रमाने नाशिककर रसिकांना मंत्रमुग्ध केले.

    वंदे मातरमच्या १५० व्या स्मरणोत्सवानिमित्त राष्ट्रगीताचे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना समर्पित हा सांस्कृतिक सोहळा विशेष ठरला.भारतीय शास्त्रीय संगीताच्या विविध अंगांचा संगम असलेल्या या कार्यक्रमात संगीत,वाद्य आणि नृत्याचा सुरेख आविष्कार सादर करण्यात आला.



    १७८५ विद्यार्थ्यांचा सहभाग

    या भव्य कार्यक्रमात १०२ गुरुकुलांमधील तब्बल १७८५ विद्यार्थी, त्यांचे गुरू आणि विविध कलाकार सहभागी झाले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्व वयोगटांतील कलाकारांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली.

    या नेत्रदीपक सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते संदीप कुलकर्णी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

    कार्यक्रमास महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अजय बोरस्ते तसेच जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांची उपस्थिती लाभली.

    भारतीय संस्कृती, परंपरा आणि शास्त्रीय संगीताचा संगम असलेल्या अंतर्नाद या कार्यक्रमाने नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेला नवी झळाळी दिली. कार्यक्रमाला उपस्थित नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कलाकारांचे भरभरून कौतुक केले.

    A Melodious Celebration of ‘Antarnad’ on the Banks of the Godavari

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supriya Sule : बारामतीपासून नागपूरपर्यंत गॅसची अडचण; सरकारने सत्य कबूल करावे; सुप्रिया सुळेंचे आवाहन; म्हणाल्या- गॅस तुटवडा का नाकारता?

    CM Fadnavis : नायगाव बीडीडी चाळीचा कायापालट; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे वितरण, यापुढे वर्षातून किमान दोन वेळा घर वाटपाचे कार्यक्रम

    Jitendra Awhad : शिवरायांबाबतच्या विधानावरून विधानसभेत वादंग; दादा भुसे, नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा; जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी