विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे म्हणतात फडणवीस कारसेवक आहे, मग तेव्हा त्यांचे वय तेव्हा होते तरी काय?, पण उद्धवजी होय मी 20 वर्षांचा होतो. तेव्हा कारसेवेला गेलो होतो. तुम्ही आम्हाला काय सवाल करणार? ”लाठी-गोली खायेंगे, मंदिर वही बनायेंगे” अशा घोषणा आम्ही त्या काळात देत होतो. पण उद्धवजी तुम्ही निसर्गाचे फोटो काढत फिरत होतात. लक्षात ठेवा, तुम्हाला आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. A manthara with Uddhav Thackeray who talks about Sri Ram’s diet eats dung
ठाण्यात आयोजित कारसेवकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर मी पण गर्वाने सांगतो मी कारसेवक आहे, 18 दिवस जेलमध्ये होतो, मंत्री म्हणून माझा दुसरा परिचय असून माझा पहिला परिचय हा रामभक्त असा आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
एक नेता दाखवा, जो कारसेवक आहे
फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही वाघ नाही आहात, तुमच्यासोबत एकही वाघ नाही. तुमच्यासोबतचा एक नेता दाखवा, जो कारसेवक म्हणून सहभागी झाला होता. उद्धव ठाकरेजी तुम्ही, माझी चिंता करू नका, फडणवीसांच्या वजनानेच बाबरी पडली अशी टीका माझ्यावर करता, पण लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे रामाची शक्ती आहे, तो हिमालयाला देखील हलवण्याची ताकद ठेवतो.
ठाकरेंसोबत एक मंथरा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी कोठारी बंधूंना शहीद केलं त्यांच्या मांडिला मांडी लावून बसले आहेत. ज्यांनी रामाला नाकारलं, त्यांच्या मांडिला मांडी लावून बसले आहेत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पण त्यांची चूक नाही. रामायणात मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणाने सांगितलं. उद्धव ठाकरेंसोबतही एक मंथरा आहे. त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार? तिकडे राजा दशरथ तरी होते. ते पुण्यवान राजे होते. इथे तुम्ही मंथरा सोबत ठेवली, काय तुमचं होईल?, असा हल्लाबोलच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
फडणवीस पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा हुंकार म्हणजे होत असलेले श्रीरामांचे मंदिर निर्माणाचे काम आहे. हा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे. हिंदूंचा उत्सव आहे. येत्या काळात म्हणजे 22 जानेवारीला घरोघरी दिवाळी उत्सव साजरा करा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमातून उपस्थितांना केले.
तुम्ही मात्र शेण खातात
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, याच ठाणे जिल्ह्यात काही महाशय आहेत, जे राम काय खात होते, यावर चर्चा करू लागले आहेत. राम काय खात होते, त्यापेक्षा तुम्ही मात्र शेण खातात, एवढं मात्र खरं आहे, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाडांचा समाचार घेतला.
A manthara with Uddhav Thackeray who talks about Sri Ram’s diet eats dung
महत्वाच्या बातम्या
- हायकोर्टाने केले स्पष्ट, जरांगेंना रोखणार नाही, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची
- डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढून 5.69% वर; खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे वाढ
- अयोध्येच्या सोहळ्यात 11 कुटुंबांना पूजेचा मान; त्यामध्ये तुळजापूरच्या महादेव गायकवाडांचा सहभाग!!
- राम मंदिराच्या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी नियतीने मोदींना निवडले… राम मंदिर आंदोलनाचे मूळ शिलेदार अडवाणींच्या भावना