विशेष प्रतिनिधी
नाशिक: संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री श्री अमीरचंदजी यांच्या निधनामुळे संस्कार भारतीत निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अवघड आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर सांगितले. A large void in Sanskar Bharati due to the demise of Amirchand; Exclamation of Dilip Kshirsagar in the mourning meeting
अमीरचंद यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेत क्षीरसागर बोलत होते. १६ सप्टेंबर २०२१ रोजी अमिरचंद यांचे पूर्वांचल प्रवासात निधन झाले होते. त्यासाठीची शोकसभा कुर्तकोटी सभागृहात घेण्यात आली होती. प्रचारक कसा घडतो, त्याच्या अंगी कोणते गुण असतात या बद्दलची सविस्तर माहिती त्यांनी दिली. प्रत्येक प्रचारकाचे आदर्श डॉ. हेडगेवार असतात आणि त्यांचाच अंश प्रत्येक प्रचारकात असतो, असे त्यांनी सांगितले. अमीरचंद यांनी केवळ ५६ वर्षाच्या आयुष्यात संघटनेसाठीचे मोठे योगदान दिले आहे.
केंद्रीय सह कोष प्रमुख रवींद्र बेडेकर यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. नाशिक संस्कार भारतीचे जेष्ठ कार्यकर्ते म्हणाले, सुरेशराव गायधनी म्हणाले की, त्यांच्यकडे एखादे काम घेऊन गेले तर ते त्याला योग्य मार्गदर्शन करायचेच. शिवाय काम अगदी चुटकी सरशी पूर्ण होणार ही खात्री असायची.
त्यांच्या बरोबर काम केलेले नाथा सातपुरकर म्हणाले की, पूर्वांचलमध्येअमिरचंद यांनी फार मोठे कार्य उभे केले’ बिहू रंगा’ हा फार मोठा कार्यक्रम पूर्वांचलमध्ये आयोजित केला. त्यासाठीचे नियोजन आणि स्वतः अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उभे होते.
मनीष मंजुळ ह्यांचे लहानपण श्री अमिरचंद जींच्या सहवासात गेले. ते म्हणाले मी एक परिवारातील सदस्य म्हणून बोलणार. त्यांची दृष्टी, विचार फार पुढचे होते, त्यांच्या कामाचा आवाका फार मोठा होता.
अनिरुद्ध तेलंग यांनी अमिरचंद यांच्या फोटोंचे संकलन करून त्याची एक चित्रफीत तयार केली. त्याचे प्रसारण ह्या प्रसंगी करण्यात आले.पश्चिम महाराष्ट्र प्रांत सह महामंत्री प्रशांत कुलकर्णी यांनी सच्चिदानंद जोशी लिखित (IGNCA) अमिरचंदजींना दिलेल्या श्रध्दांजलीपर कवितेचे वाचन केले. संस्कार भारतीचे सचिव अरुण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
A large void in Sanskar Bharati due to the demise of Amirchand; Exclamation of Dilip Kshirsagar in the mourning meeting
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election 2022 : प्रियांका गांधींची मोठी घोषणा, उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास मुलींना देणार स्मार्टफोन आणि स्कूटी
- पाकिस्तानात वाढत्या महागाईमुळे विरोधक उतरले रस्त्यावर, जुलमी इम्रान सरकारपासून सुटका मिळण्याची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाचे CJI रमण्णा यांनी कायदामंत्र्यांसमोरच पायाभूत सुविधांवर केला सवाल, म्हणाले – ‘न्यायालयांसाठी उत्तम पायाभूत सुविधा ही फक्त एक कल्पना!’
- महागाईचा परिणाम : 14 वर्षांनंतर वाढणारे आगपेटीचे दर, एका झटक्यात दुप्पट होणार किंमत