• Download App
    घातपाताचा मोठा कट; राम मंदिर, 26 जानेवारी, जी 20 परिषद दहशतवाद्यांच्या टार्गेटवर A large cut of casualties; Ram Mandir, January 26, G20 Parishad targeted by terrorists

    घातपाताचा मोठा कट; राम मंदिर, 26 जानेवारी, जी 20 परिषद दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात दहशतवाद्यांनी घातपातचा मोठा कट रचल्याचे धक्कादायक बातमी आहे. गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे राम मंदिर, 26 जानेवारी, जी 20 परिषद लक्ष्य आहे. राम मंदिरावर आत्मघाती बॉम्बहल्ला अशी टार्गेट्स दहशतवाद्यांनी निश्चित केली आहेत. 26 जानेवारीला दिल्ली आणि पंजाबसह इतर महत्त्वांच्या शहरांमध्ये घातपात करण्याचा आणि जी 20 परिषदेत सायबर हल्ल्याचा कट दहशतवाद्यांची आखला आहे. A large cut of casualties; Ram Mandir, January 26, G20 Parishad targeted by terrorists

    काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी अल-कायदा या दहशतवादी संघटनेने दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिरावर आत्मघाती बॉम्बहल्ल्याचा कट असल्याचा सतर्कतेचा इशारा गुप्तचर संस्थेने दिला आहे. जैश ए मोहम्मद संघटनेने या हल्ल्याचा कट आखल्याची माहिती मिळत आहे. तसेच नेपाळ, पाकिस्तान मार्गे अतिरेकी पाठवण्याचे षडयंत्र आखल्याचे समोर आले आहे. यामुळे उत्तर प्रदेशचे पोलीस अलर्ट झाले असून नेपाळ – भारत सीमेवरील मुव्हमेंटचा तपास केला जात आहे.

    २६ जानेवारी संदर्भातील अलर्ट

    दिल्ली आणि पंजाबसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा संघटनेकडून घातपात करण्याची तयारी केल्याचे सांगितले गेले आहे. यासाठी पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेची मदत घेतली आहे. यात दाऊद इब्राहिम गँगचा देखील हात आहे. शिवाय बांगलादेशी अतिरेकी संघटनेचाही वापर केला जात आहे. इतर संघटनांचाही देशात घातपात करण्यासाठी वापर केला जात असल्याचे सांगितले गेले आहे.

    जी 20 परिषद संदर्भात अलर्ट

    इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा संघटनेने जी 20 परिषदेवर सायबर हल्ला करण्याचा कट रचला आहे. ज्यावेळी जी 20 परिषदेमध्ये हॉर्नेट प्रतिनिधी येतील, त्यावेळी सायबर अटॅक केला जाण्याची शक्यता आहे.

    A large cut of casualties; Ram Mandir, January 26, G20 Parishad targeted by terrorists

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!