विशेष प्रतिनिधी
येवला ( नाशिक ):- येवला शहरातील पारेगाव रोड लगत असलेल्या टायरच्या दुकानाला भीषण आग लागली. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. आग विझविण्याचा प्रयत्न केला.A huge fire in the shop Of Yeola
मात्र या आगीमध्ये दुकानाचे सामान व सर्व टायर्स जळून खाक झाले. या दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात लाखोचे नुकसान झाले आहे .आगीचे कारण अस्पष्ट असून आग बघणसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली.
आग आटोक्यात
टायरच्या दुकानाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. मात्र त्वरित घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवान तुषार लोणारी यांनी आटोकाट प्रयत्न केल्याने अन्य दुकानात आगीचा शिरकाव झाला नाही. त्यामुळे दुर्घटना टळली.
- येवल्यात टायरच्या दुकानाला भीषण आग
- अग्निशामक दलाची घटनास्थळी धाव
- तातडीने हालचाल केल्याने आग आटोक्यात
- परिसरातील दुकाने आगीपासून वाचली