• Download App
    Nashik : ब्राह्मण समाजाच्या बदनामीच्या निषेधार्थ ब्राह्मण महासंघाचा भव्य मोर्चा; मनसे, भाजप नेते सहभागी; |A grand march of the Brahmin Federation to protest against the defamation of the Brahmin community

    Nashik : ब्राह्मण समाजाच्या बदनामीच्या निषेधार्थ ब्राह्मण महासंघाचा भव्य मोर्चा; मनसे, भाजप नेते सहभागी;

    प्रतिनिधी

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक उद्गार काढले त्याच्या निषेधार्थ ब्राह्मण महासंघाने आज नाशिक मध्ये भव्य मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मनसे आणि भाजपचे नेते सहभागी झाले होते.A grand march of the Brahmin Federation to protest against the defamation of the Brahmin community

    भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, महापौर नाना कुलकर्णी, मनसेचे जिल्हाप्रमुख अंकुश पवार आदी नेत्यांनी मोर्चात सहभागी होऊन ब्राह्मण समाजाला आपला पाठिंबा दर्शवला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी पुण्याहून ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे आले होते. तसेच नाशिक मधील प्रख्यात वकील अविनाश भिडे, उद्योजक धनंजय बेळे हे देखील मोर्चात सहभागी झाले होते.



    त्याच वेळी ब्राह्मण समाजाच्या बद्दल अमोल मिटकरींनी काढलेल्या बदनामीकारक वक्तव्याचा त्या सर्वांनी एकमुखाने निषेध केला. या मोर्चाला नाशिक मधील ब्राह्मण समाज याबरोबरच अन्य समाजांनी देखील पाठिंबा व्यक्त करून सहभाग नोंदवला.

    ओबीसी सुवर्णकार समितीचे राजू घोडके आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

    तसेच नाशिक मधील विविध पुरोहित संघ, त्यांचे कार्यकर्ते तसेच प्रख्यात पुरोहित श्री. मुकुंद खोचे, भद्रकाली मंदिराचे पुजारी मंदार कावळे आदी पुरोहित आणि ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. यानंतर जिल्हाधिकार्‍यांना अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध असेल निवेदन देऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.

    A grand march of the Brahmin Federation to protest against the defamation of the Brahmin community

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना