• Download App
    कांजूरमार्गमधील सॅमसंग मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये लागली आग ; दहा नागरिकांचे प्राण वाचवले|A fire broke out at the Samsung Mobile Service Center in Kanjurmarg; Saved the lives of ten civilians

    कांजूरमार्गमधील सॅमसंग मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये लागली आग ; दहा नागरिकांचे प्राण वाचवले

    यावेळी फ्रीज आणि एसी चे कॉम्प्रेसर जळाल्यामुळे या आगीत भडका आणखीन वाढला.A fire broke out at the Samsung Mobile Service Center in Kanjurmarg; Saved the lives of ten civilians


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या कांजुर पूर्वेकडील अपेक्स इंडस्ट्रियल इस्टेट परिसरामध्ये असलेल्या एका सॅमसंग कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली. यावेळी फ्रीज आणि एसी चे कॉम्प्रेसर जळाल्यामुळे या आगीत भडका आणखीन वाढला. ज्यामुळे ही आग शेजारी असलेल्या डेकोरेशनच्या गोदामांना देखील लागली.तसेच काही ऑइलची गोदामे देखील या आगीत जळून खाक झाली.



    ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी या गोदामात दहा कर्मचारी होते.यावेळी त्या दहा कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच बाहेर काढले.अग्निशमन दलाच्या २२ पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरा ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

    ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज हा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही .

    A fire broke out at the Samsung Mobile Service Center in Kanjurmarg; Saved the lives of ten civilians

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस