आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.अग्निशमन दलाने ही लेवल तिनची आग असल्याचं जाहीर केलं आहे.A fire broke out at the Prime Mall in Mumbai, 10 vehicles of the fire brigade arrived at the spot
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरातील इर्ला मार्केट येथील प्राईम मॉलला ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.अग्निशमन दलाने ही लेवल तिनची आग असल्याचं जाहीर केलं आहे.
आगीची तीव्रता पाहता इर्ला मार्केट परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.ही आग इतकी भीषण आहे की दूर-दूरुन आगीच्या धुराचे लोट पहायला मिळत आहेत. आग अतिशय वेगाने पसरत असल्याचं पहायला मिळत आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. इर्ला मार्केट हा परिसर अतिशय गजबजलेला असून या परिसरात अनेक दुकाने आहेत.विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या विक्रीसाठी हा बाजार ओळखला जातो.
A fire broke out at the Prime Mall in Mumbai, 10 vehicles of the fire brigade arrived at the spot
महत्त्वाच्या बातम्या
- देवा, ठाकरे – पवार सरकारला बुद्धी दे, एसटीच्या कर्मचाऱ्यांची सामूहिक प्रार्थना ; विलिनीकरणाचा निर्णय लवकर होण्यासाठी साकडे
- लेडी सिंघम तेजस्वी सातपुते यांना’नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार
- ‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मान झुकवली’ ; राहुल गांधींनी केंद्र सरकारवर साधला निशाणा
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : स्पेसएक्स म्हणजे नेमके आहे तरी काय