आग पसरल्यास या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.A fierce fire at a plastic godown in the Mandala area of Mankhurd; No casualties were reported, 12 fire trucks arrived at the scene
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मानखुर्दच्या मंडाला परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊनला भिषण आग लागली.ही आग पहाटे तीनच्या सुमारास लागली आहे. दरम्यान स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. दरम्यान अग्निशमनदलाच्या १२ गाड्या घटनास्थळी हजर झाल्या.
अग्निशमन दलाचे १५० जवान ही आग विझवण्याचे काम करत आहेत. या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.आग पसरल्यास या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान मानखुर्द परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भंगाराचे गोडावून आहेत. तसेच या परिसरात लोकवस्ती देखील दाट आहे. नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
A fierce fire at a plastic godown in the Mandala area of Mankhurd; No casualties were reported, 12 fire trucks arrived at the scene
महत्त्वाच्या बातम्या
- सध्या राज्यात राजकीय टोळीयुद्ध,उध्दव ठाकरेंकडून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा, राजू शेट्टी यांची टीका
- ममता बॅनर्जींनी माजी टेनिस स्टार लिएंडर पेसला उतरविले गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, तृणमूल कॉँग्रेसचा मुख्य चेहरा होणार
- भुजा भुजामध्ये समता म्हणून भुजबळांवर उल्लेख पण सावकरांचा उल्लेखच नव्हता, साहित्य संमेलनाच्या गीतात, सावकरप्रेमींच्या संतापानंतर आयोजकांना उपरती
- गॅँगस्टरच्या पत्नीचा धक्कादायक आरोप, पतीनेच उच्चपदस्थांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, राजीव शुक्ला, हार्दिक पंड्या, मुनाफ पटेल यांनी केला बलात्कार
- सत्तेचा माज आला असे वागू नका, एसटी कर्मचाऱ्याशी चर्चा करा, सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा