• Download App
    Purandar airport पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती; 1216 आर हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी करून शासनाला अहवाल देण्याचे निर्देश

    पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती; 1216 आर हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी करून शासनाला अहवाल देण्याचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर, पुणे येथील विमानतळासंदर्भात आढावा बैठक पार पडली. पुणे शहर व परिसरातील वेगवान औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि गुंतवणूक आकर्षण लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुंबई येथे झालेल्या या आढावा बैठकीत त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) कालमर्यादेत भूसंपादन, निधी उपलब्धतेची ठोस पद्धत आणि सिडको, नगरविकास यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याचे आणि आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याचे निर्देशही दिले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की विमानतळाच्या उभारणीनंतर हा परिसर ‘डेव्हलपमेंट झोन’ म्हणून विकसित होणार असून, सिडकोने आत्ताच जमीन उपलब्धतेची खात्री करावी. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची क्षमता वाढवून राज्यातील सर्व निर्माणाधीन विमानतळांचे विकासकाम या कंपनीकडे देण्यात यावे. तसेच उर्वरित भूसंपादनासाठी एमआयडीसीने अधिसूचना काढावी आणि निधी उपलब्धतेबाबतचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

    सद्यस्थितीत प्रस्तावित क्षेत्रातील 1216 हेक्टर आर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण करून हरकतींचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

    दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वनपुरी, कुंभार वळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी व पारगाव या सात गावांमध्ये भूसंपादन सुरू असून, या गावांमध्ये भूसंपादनासाठी गावनिहाय उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    A decisive step for Pune’s future, the Purandar airport project gains momentum.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!