वृत्तसंस्था
धरणगाव : मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात शेतकरी पती-पत्नी बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना निंभोरा, ता. धरणगाव येथे गुरुवारी दुपारी ३.३० घडली. दरम्यान, या पुरातून महिला बचावली आहे. पतीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. A bullock cart along with the Farmer couple is swept away in flood
धरणगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. भागवत भिका पाटील (५५) आणि त्यांची पत्नी मालूबाई पाटील (५०) हे बैलगाडीने शेतातून घराकडे परतत होते. बैलगाडी खैऱ्या नाल्यातून जात असतानाच पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यातच बैलगाडीसह पती-पत्नी वाहून गेले.
मालूबाई हिने एका झाडाला पकडून ठेवल्याने ती बचावली. पोलिस पाटील गुलाब सोनवणे व ग्रामस्थांनी पाणी पातळी खाली गेल्यावर जवळपास दोन किमी अंतरापर्यंत पाहणी केली; पण भागवत हे कुठेही आढळून आले नाहीत. नाल्यापासून काही अंतरावर दोन्ही बैल मृतावस्थेत तर बाजूला गाडीही पडलेली आढळून आली.
अंगावर वीज पडून महिला ठार
जामनेर येथे अंगावर वीज पडून जिजाबाई एकनाथ पाटील (५०, रा. हिंगणे पिंप्री, ता. जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाला.जिजाबाई ह्या शेतातून घरी परतत असताना ही घटना घडली.
A bullock cart along with the Farmer couple is swept away in flood
महत्त्वाच्या बातम्या
- साधू, महापुरुषांमुळे देश अक्षयवटाप्रमाणे उभा; सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांचे उदगार
- आषाढी यात्रेतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
- रिक्षाचालक महिलेला मारहाण; वेदनादायक घटना ; चित्रा वाघ ;मीटरप्रमाणे पैसे आकारल्याने संताप
- अँटिग्वात जामीन मिळताच भगोड्या मेहूल चोक्सीच्या भारतीय तपास यंत्रणावरच दुगाण्या
- मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला, अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमान; काळजी घेण्याचे आवाहन