• Download App
    भाजप आमदार प्रसाद लाडांच्या घराबाहेर सापडली सोने - चांदी, पैश्यांनी भरलेली बॅग, तपास सुरूA bag full of gold, silver and money was found outside the house of BJP MLA Prasad Lad

    भाजप आमदार प्रसाद लाडांच्या घराबाहेर सापडली सोने – चांदी, पैश्यांनी भरलेली बॅग, तपास सुरू

    प्रतिनिधी

    मुंबई : भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंगा येथील निवासस्थानाबाहेर रविवारी एक संशयास्पद बॅग सापडली आहे. त्यांच्या घराबाहेर ही बॅग कोणी अज्ञात व्यक्ती टाकून गेल्याचे समजते. या बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवाच्या मूर्ती असा ऐवज सापडला असून पोलिसांनी पंचनामा करून बॅग ताब्यात घेतली आहे. मात्र ही बॅग नेमकी कोणी आणि का ठेवली याचा तपास सुरू आहे. A bag full of gold, silver and money was found outside the house of BJP MLA Prasad Lad

    नेमके काय घडले?

    लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी त्यांना सुरक्षारक्षकाचा फोन आला. त्यांच्या घराबाहेर एक बॅग असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. त्यानंतर मी तात्काळ माटुंगा पोलिसांना फोन केला. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बॅगची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना या बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवाच्या मूर्ती असा ऐवज सापडला. पोलिसांनी पंचनामा करून ही बॅग ताब्यात घेतली आहे. माझ्या घराबाहेर बंदोबस्त असतानाही अज्ञात व्यक्ती अशाप्रकारे बॅग ठेवून जाते. त्यामुळे मी देखील धास्तावलो आहे. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रसंग घडल्याने माझे कुटुंबीयही घाबरले आहेत, अशी प्रतिक्रिया लाड यांनी व्यक्त केली.

    तसेच हा प्रकार याअगोदर झाला होता. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी लाड यांनी केली आहे. आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत. ही बॅग लाड यांच्या घराबाहेर कोणी टाकली याचा तपास सुरू असून त्यानंतर या मागील गुढ सर्वांसमोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. तर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या वस्तू ताब्यात घेऊन अज्ञात चोरट्या विरुद्ध घडफोडीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती माटुंगा पोलिसांनी दिली आहे.

    A bag full of gold, silver and money was found outside the house of BJP MLA Prasad Lad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस