विशेष प्रतिनिधी
जळगाव – जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त पक्षिमित्रांनी नुकतीच वाघूर धरण परिसरात पक्षी गणना केली आहे. त्यात ६८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. विशेषत: रेषाळ बगळा आणि तपकिरी खाटीक हे हिवाळी पाहुणे म्हणून गणल्या जाणाऱ्या पक्ष्यांची नोंद झाली. 972 birds recorded at Jalgaon Waghur Dam
पक्षी व पर्यावरण यांचा परस्पर संबंध आहे. पाणथळ पक्ष्यांचे अस्तित्व हे पाणथळ जागेच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षिमित्र अभ्यासाक शिल्पा गाडगीळ, राजेंद्र गाडगीळ, बाळू महांगडे यांनी सालाबादप्रमाणे यावर्षीही जळगाव तालुक्यातील वाघूर धरणावर पक्षीगणना केली.
गणनेत पाणथळ पक्ष्यांत प्रामुख्याने वारकरी २१८, छोटा पाणकावळा ९०, सोबत अल्प संख्येने गडवाल, तरंग, थापट्या, भुवई बदक, लालसरी, साधा पाणलाव, नदी सुरय, ठिपकेवाली तुतारी, काळ्या शेपटीचा मालगुजा, कंठेरी चिखला, पाणकाडी बगळा, मोरशराटी, काळा शराटी, शेकाट्या, चिखल्या, हिवाळी सुरय, पांढुरका हरीण, उघड्या चोचीचा करकोचा, आशियाई कवडी मैना, करडा धोबी, हिरवा बगळा, पांढऱ्या भुवईचा धोबी, पांढरे धोबी, युरेशियन दलदल इत्यादी पाणपक्ष्यांची नोंद केली.
गेल्या वर्षी ६५ प्रजाती व २ हजारांच्यावर पक्ष्यांची नोंद झाली होती. यावेळी पक्षांच्या प्रजांतींची संख्या वाढली असली तरी पक्ष्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. यावर्षी ६८ प्रजाती व ९६८ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी फारसे परदेशातून येणारे पक्षी दिसले नाही. सर्वत्र पाणवठे फुल्ल असल्यामुळे विभागले गेले असावेत.
972 birds recorded at Jalgaon Waghur Dam
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यपालांच्या हस्ते उद्योजकांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार प्रदान
- Share Market : सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळून ५७ हजारांच्या खाली, निफ्टी १७ हजारांच्या खाली घसरला
- महाराष्ट्र काँग्रेस उत्तर भारतीय सेलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ
- गोव्यात मतदान सुरू : मुख्यमंत्री सावंत यांचा दावा – भाजप पुन्हा करणार सरकार स्थापन; उत्पल पर्रीकरांना विजयाचा आत्मविश्वास