• Download App
    शिंदे - फडणवीसांचा दणका : अजितदादांनी घाईगर्दीत मंजूर केलेल्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती!! 941 crore works approved in haste by Ajitdada

    शिंदे – फडणवीसांचा दणका : अजितदादांनी घाईगर्दीत मंजूर केलेल्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी आणि अजित पवारांना चांगलाच दणका दिला आहे. शिंदे सरकारने पुणे नगरविकास विभागाच्या ९४१ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. यामध्ये बारामती नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला होता. तसेच, बारामती नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुचविलेल्या विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. 941 crore works approved in haste by Ajitdada

    पवारांच्या मतदार संघातील कामांना ब्रेक

    मिळालेल्या माहितीनुसार, ९४१ कोटी रुपयांच्या नगरविकास विभागांच्या कामांना स्थगिती देण्यात आली असून विशेष म्हणजे यापैकी तब्बल २४५ कोटींची कामे ही बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून होणार होती. महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या काळात या विकास कामांना मंजूरी दिली होती. मार्च २०२२ ते जून २०२२ या कालावधीमध्ये यांना मंजुरी मिळाली होती. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे अजित पवार यांच्या मतदार संघातील कामांना ब्रेक लागणार असल्याचे सांगितले जात आहे.



    राज्यात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारची अनेक कामे पुढे ढकलली आहेत. कांजूर मार्गावरील मेट्रो कारशेडचे काम पुन्हा आरे कॉलनी, गोरेगाव येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मागील सरकारने बुलेट ट्रेनचे काम थांबवले होते, त्याला नव्या सरकारने मंजुरी दिली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घाईगर्दीत मंजूर केलेली विकासकामे थांबवली होती. आज मुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी घाईगर्दीत मंजूर केलेली पुणे नगरविकास विभागाची ९४१ कोटींची मंजूर कामे तत्काळ स्थगित केली आहेत.

    दरम्यान, शिवसेनेवर नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांनी अजित पवार महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी देत नसल्याची तक्रार केली होती. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

    941 crore works approved in haste by Ajitdada

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा