वृत्तसंस्था
पुणे : गेल्या वर्षी 8 मार्च 2022 जागतिक महिला दिनाच्या निमित्त जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने महिलांना “घराचा मालक बनवा” असा खास ठराव मंजूर केला. त्याचाच रिझल्ट म्हणजे आज 8 मार्च 2023 मध्ये पुणे जिल्ह्यातील 8 लाख 15 हजार 573 महिला आपल्या घराच्या कायदेशीर मालक बनले आहेत. इक्वलिटी नुसतीच नावापुरती न राहता, ॲक्शन द्वारे खरंच घरातील महिलांना घर त्यांच्या नावावर करून पुरुष स्त्री समान भावनेत उतरविले आहे. 8.15 lakh women in Pune district became the owners of their houses!
8 मार्च 2022 ग्रामस्थांमध्ये खास ठराव मंजूर केला गेल्यानंतर गावागावात घराच्या सातबारा उताऱ्यावर महिलांची नावे नोंदविणे. याच माध्यमातून महिलांना घरांची मालकी देणे. आणि मिळकती पुरुषांच्या बरोबरी महिलांना समान हक्क मिळावा. असा उद्देश या उपक्रमाचा अंमलबजावणी मागे जिल्हा परिषदेने ठेवला होता.
जिल्ह्यातील गाव-गावातील महिलांना घराची मालकी मिळावी. यासाठी प्रॉपर्टी कार्डवर महिलांचे नाव नोंदविणे, त्याचे वितरण करणे, काही गावांमध्ये प्रॉपर्टी कार्डाचे वाटप करणे. आदी बाबींवर गेल्या वर्षभरात अंमलबजावणी सुरू आहे. त्यात 6 लाख 42 हजार 86 घरांचा सातबारा उतारा आणि 8 अ उताऱ्यावर महिलांच्या नाव नोंदणी करण्यात आली. गेल्या वर्षभरात त्यात आणखी 1 लाख 77 हजार 577 घरांची भर पडली.
8.15 lakh women in Pune district became the owners of their houses!
महत्वाच्या बातम्या
- प्रियंका गांधींच्या पीएविरुद्ध एफआयआर, अर्चना गौतम यांनी केले गंभीर आरोप – जाणून घ्या संपूर्ण वाद
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू, राजस्थानमध्ये महिलांना मोफत बस प्रवास
- नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करणार, 5 हजार लोकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली
- Afghanistan Issue : भारत चाबहार बंदरमार्गे २० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवणार