• Download App
    68वे राष्ट्रीय पुरस्कार : ‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ सर्वोत्कृष्ट चित्रपट|68th National Awards Goshta Eka Paithani Best Feature Film, Tanhaji The Unsung Warrior Best Film

    68वे राष्ट्रीय पुरस्कार : ‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

    प्रतिनिधी

    मुंबई : 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी झाली. अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. तर बेस्ट फीचर फिल्ममध्ये मराठीत ‘गोष्ट एका पैठणीची’ व हिंदीत ‘तुलसीदार ज्युनिअर’ चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले.68th National Awards Goshta Eka Paithani Best Feature Film, Tanhaji The Unsung Warrior Best Film

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘तान्हाजी…’साठी अजय देवगण आणि ‘सोरारई पोटरु’साठी सूर्या यांना विभागून दिला. ‘मी वसंतराव देशपांडे’ चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. स्पेशल ज्युरी अवॉर्ड मराठीतील ‘जून’ या चित्रपटासाठी सिद्धार्थ मेननला मिळाला.



    ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. तर बेस्ट फिचर फिल्ममध्ये मराठीत ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि हिंदीत ‘तुलसीदार ज्युनिअर’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दोन अभिनेत्यांना विभागून देण्यात आला आहे. ‘तान्हाजी…’साठी अजय देवगण आणि ‘सोरारई पोटरु’साठी सूर्याला हा पुरस्कार दिला आहे.

    ‘मी वसंतराव देशपांडे’ चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. स्पेशल ज्युरी अवॉर्ड मराठीतील जून या चित्रपटासाठी सिद्धार्थ मेननला मिळाला. तर ‘अवांछित’ आणि ‘गोदाकाठ’ या चित्रपटातील भूमिकांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष सन्मान मिळाला आहे.

    ‘टकटक’ मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी अनिष मंगेश गोसावीला बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला. ‘सोरारई पोटरु’चे जी. व्ही. प्रकाश कुमार यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा मान मिळाला. तर ‘तान्हाजी’ला सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरचा पुरस्कार मिळाला. गीतलेखनाचा पुरस्कार ‘सायना’ (हिंदी) ला मिळाला. त्याचे गीतकार मनोज मुंतशीर आहेत.

    सर्वोत्कृष्ट हरियाणवी चित्रपट म्हणून ‘दादा लक्ष्मी’ची निवड करण्यात आली. मोस्ट फ्रेंडली फिल्म स्टेटचा पुरस्कार मध्यप्रदेशला मिळाला. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडला संयुक्तपणे स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला.

    68th National Awards Goshta Eka Paithani Best Feature Film, Tanhaji The Unsung Warrior Best Film

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य