• Download App
    राजसाहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंचे वक्तव्य 65 toll booths were closed because of Rajsaheb, another toll booth was closed because of me

    राजसाहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंचे वक्तव्य

    प्रतिनिधी

    मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवार ते अहमदनगर आणि शिर्डीला गेले होते. समृद्धी महामार्गावरून नाशिककडे परतत असताना सिन्नर तालुक्यातील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची कार कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यानंतर मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. आता यावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज साहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे एक टोलनाका बंद झाला, असे वक्तव्य त्यांनी केले. 65 toll booths were closed because of Rajsaheb, another toll booth was closed because of me

    अमित ठाकरे म्हणाले, शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यावर नाशिकमध्ये काम असल्याने निघालो होतो. समृद्धी महामार्गावरून जात असताना सिन्नर येथील टोलनाक्यावर कार थांबवण्यात आली. कारला फास्टटॅग असतानाही टोलनाक्यावरील फाटक उचलले नाही.


    अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने गोंदे टोल नाक्यावर मनसैनिकांकडून तोडफोड, समृद्धी महामार्गावर तोडफोडीची पहिलीच घटना


    टोलनाकावाल्यांची काहीतरी तांत्रिक अडचण होती. तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी गाडी का थांबवली? असे विचारलं. त्यावर तांत्रिक कारण असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. पण, टोलनाक्यावरील कर्मचारी उद्घट बोलत होते. कर्मचाऱ्याने मॅनेजरला फोन केल्यावर तो सुद्धा उद्धट भाषेत बोलत होता, अशी तक्रार अमित ठाकरे यांनी केली.

    “१० ते १५ मिनिटानंतर त्यांनी टोलनाक्यावरून गाडी सोडली. पण, हॉटेलला पोहचल्यानंतर कळलं की टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यामुळे ६५ टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला, असे अमित ठाकरे म्हणाले.

    65 toll booths were closed because of Rajsaheb, another toll booth was closed because of me

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!