वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होत आहे. रविवारी तर राज्यात कोरोनाने कहर केला. रुग्णांच्या उच्चांकांची नोंद झाली आहे. 63 thousand 294 people corona bite on Sunday; 349 dead
राज्यात रविवारी 63 हजार 294 नवीन रुग्णांचे निदान झाले. या उलट शनिवारी 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी, 34 हजार 008 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर 349 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.7 टक्के आहे.
27 लाखांवर लोक कोरोनामुक्त
राज्यात आतापर्यंत एकूण 27 लाख 82 हजार 161 रुग्णांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.65 टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासलेल्या 2,21,14,372 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 34,07,245 (15.41 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 31,75,585 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,२694 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.