• Download App
    राज्यातील सहा जिल्हा परिषदांमधील निवडणुकीत ६३ टक्के मतदान |63 percent voting in ZP election

    राज्यातील सहा जिल्हा परिषदांमधील निवडणुकीत ६३ टक्के मतदान

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांतील ८४; तर त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६३ टक्के मतदान झाले.63 percent voting in ZP election

    सर्व ठिकाणी बुधवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल.प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: धुळे- ६०, नंदुरबार- ६५, अकोला- ६३, वाशीम- ६५, नागपूर- ६० आणि पालघर- ६५. एकूण सरासरी- ६३.



    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या ६ जिल्हा परिषदेच्या ८५ निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या १४४ निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या.

    63 percent voting in ZP election

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबली, आता 12 नोव्हेंबरला निर्णय

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- अजित पवारांनी साप पोसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत