वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर यांची प्रचंड गरज निर्माण होते आहे. ती भागविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहे. 62 PSA oxygen plants have been sanctioned by GoI for installation in public health facilities in all states
देशभरात PSA (Pressure Swing Adsorption) ऑक्सिजन उत्पादन प्लँट्स उभारणीला मंजूरी देण्यात आली आहे. हे प्लँट्स सरकारी हॉस्पिटलच्या परिसरात असतील. यातून 154.19 MT मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादन होईल.
ऑक्सिजन उत्पादन प्लँट्स मंजूर झालेली यादी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. यातले ३३ प्लँट्स आधीच इन्स्टॉल करण्यात आले असून बाकीचे लवकरात लवकर इन्स्टॉल करण्यात येतील, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
-रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादन डबल करणार
वाढती मागणी लक्षात घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादन डबल करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. सध्या देशात दिवसाला १.५० लाख व्हायरल्स एवढे उत्पादन होत आहे. येत्या १५ दिवसांत ते डबल करून दिवसाला ३ लाख व्हायरल्स एवढे उत्पादन करण्यात येईल. सध्या २० प्लँट्समधून रेमडेसिवीरचे उत्पादन होत आहे. आणखी २० प्लँट्समधून उत्पादनाला परवानगी देण्यात आली आहे. आणि ते नियंत्रित किमतीत उपलब्ध करून दिले जाईल, असे मांडविया यांनी स्पष्ट केले आहे.
62 PSA oxygen plants have been sanctioned by GoI for installation in public health facilities in all states