• Download App
    Uday Samant दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात

    Uday Samant : दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 6 हजार कोटींची गुंतवणूक, उदय सामंत यांची माहिती

    Uday Samant

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Uday Samant राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काल पहिल्या दिवशी सुमारे सहा लाख कोटींची एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मागच्या दोन वर्षाची प्रतिमा आम्ही कायम ठेवली, असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.Uday Samant

    दावोस येथून जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सामंत म्हणाले, आज दावोसला येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचा दुसरा दिवस आहे. आज देखील कालच्यासारखीच गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. मी आपल्या सगळ्यांना आठवण करुन देतो की गेली दोन वर्ष राज्याचा उद्योगमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली मी याठिकाणी आलो होतो. हे करत असताना पहिल्या वर्षी आम्ही १ लाख ३७ हजार कोटी, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दावोसमध्ये येऊन ३ लाख ७० हजार कोटी आणि मुंबईला गेल्यानंतर २ लाख कोटी असे ५ लाख ७० हजार कोटींचे एमओयू करण्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही यशस्वी झालो. त्याच्यामधून ८३ टक्के प्रकल्पांची अंमलबजावणी आपण करतोय . ही अंमलबजावणी करताना त्यांना जमीनी, पॅकेज दिलेले आहेत, हा तीन ते चार वर्षाचा काळ असल्यामुळं येत्या दोन वर्षामध्ये मागील दोन वर्षाच्या एमओयूची परिपूर्तता होईल आणि प्रकल्प उभे राहतील.



    सामंत म्हणाले, कालच्या या सहा लाखाच्या एमओयूमध्ये डिफेन्स, सिडको सारख्या संस्थेचे इन्फ्रास्ट्रक्चरचे एमओयू आहेत काही संस्थांशी केलेले टेक्निकली आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं मुलं तयार होण्यासाठी केलेले एमओयू आहे, Data centreमध्ये केलेले एमओयू आहेत. असे विविध प्रकारचे सेक्टरमध्ये काल आम्ही सहा लाख कोटींचे एमओयू केले ही परकीय गुंतवणूक आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आज देखील अनेक उद्योजकांशीदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत.

    अनेक उद्योजकांनी याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उद्योग करण्याचा निर्णय आणि उद्योजक म्हणून महाराष्ट्रामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे सांगून सामंत म्हणाले, आजदेखील अनेक कंपन्यांशी आम्ही एमओयू करणार आहोत. मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये जाऊन देखील स्वतःचं भाषण करणार आहेत. महाराष्ट्राचं नक्की उद्योगाच्या बाबत धोरण काय आहे हे देखील त्याठिकाणी सांगतील.

    गेली दोन वर्ष याच ठिकाणी एकनाथ शिंदेंनी देखील महाराष्ट्राची भूमिका मांडली होती. आम्ही इथल्या उद्योजकाला येणाऱ्या गुंतवणुकीच्या निमित्ताने येणारी जी लोकं आहेत त्यांना सांगतोय की मैत्रीसारखा एक अतिशय महत्वाचा कायदा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणलाय आणि तो कायदा अपडेट करण्याच्या दृष्टीनं आम्ही पाऊलं टाकली आहेत . येत्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पोर्टल लॉंच करतोय.

    ते पोर्टल आल्यानंतर उद्योजकांना कमीतकमी वेळामध्ये सगळे दाखले मिळायला त्याचा उपयोग होणार आहे. उद्योजकांची जी कायमस्वरूपी एक तक्रार असते की आम्ही अर्ज केल्यानंतर आम्ही अॅप्लीकेशन केल्यानंतर आमची फाईल कुठे आहे? कुठच्या अधिकाऱ्याकडे आहे? कुठच्या कक्ष अधिकाऱ्याकडे आहे? किती दिवस आहे? हे आम्हाला कळत नाही. देशातलं हे पहिलं पोर्टल असं आहे की अॅप्लीकेशन कसं करायचं? आणि अॅप्लीकेशन केल्यानंतर ते अॅप्लीकेशन नक्की कुठं आहे? हे दाखवणार पोर्टल पुढच्या आठ दिवसामध्ये कॅबीनेटच्या निमित्त आम्ही हाराष्ट्रामध्ये आणतोय त्याचं देखील अनेक उद्योजकांनी स्वागत केलेलं आहे,असे त्यांनी सांगितले.

    सामंत म्हणाले , मला एवढंच सांगायचं आहे की हा जो दौरा आहे, हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीच्या निमित्तानं अतिशय महत्वाचा दौरा आहे आणि तो महत्वाचा दौरा असताना उद्योजकांना आकर्षित करणं, त्यांची गुंतवणूक आकर्षित करणं आणि FDI महाराष्ट्रामध्ये आणणं हे धोरण घेऊनच आम्ही आलो आहोत. काल देखील मोठे उद्योजक मुख्यमंत्र्यांना भेटले त्यांनी देखील विश्वास दिला आहे की महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही आणतो आणि महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, अशा पद्धतीचं आश्वासन काल देखील अनेक उद्योजकांनी दिलेलं आहे. आज देखील मला असं वाटतं की क्षेत्रातले ज्यांना आपण पोलादी पुरुष म्हणतो लक्ष्मण मित्तल, तटाचे चंद्रशेखरन मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की उद्योजकांना विश्वास देणं आणि उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये आणणं हा प्राधान्यक्रम घेऊनच हे दौरे आयोजित केले आहेत – आजच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्या माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत, या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की जे होत आहे आणि ते झाल्यानंतर आमच्यातले काही हितचिंतक याची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष ठेऊन असतात. त्याचं उत्तर म्हणजे मागील दोन वर्षांमध्ये झालेले जे एमओयू होते त्यामधले ८३ टक्के आम्ही प्रत्यक्षामध्ये उतरवतोय. आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना सहकार्य करतोय आणि अनेक उद्योजकांनी सांगितलं काल जर आपण बघितलं असेल की कालचा सगळ्यात मोठा जो मास्टर स्ट्रोक होता तो JSW नं तीन लाख कोटींचा एमओयू आपल्याबरोबर केलाय आणि विविध भागांमध्ये केला आहे, आधीच विदर्भ, मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये त्यांचे प्रकल्प सुरु आहेत.

    6 thousand crore investment in Maharashtra on the first day of Davos conference, Uday Samant’s information

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस