• Download App
    ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 55 हजार कोटींची कर नोटीस; एकूण उत्पन्नावरील जीएसटी भरणा थकवल्याचा आरोप|55 thousand crore tax notice to online gaming companies; Allegation of failure to pay GST on gross income

    ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 55 हजार कोटींची कर नोटीस; एकूण उत्पन्नावरील जीएसटी भरणा थकवल्याचा आरोप

    वृत्तसंस्था

    मुंबई : जीएसटी गुप्तचर विभागाने 55 हजार कोटी कर थकबाकीबद्दल 12 कॅसिनो आणि 12 ऑनलाइन रिअल-मनी गेमिंग कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये ड्रीम इलेव्हन, गेम्स प्ले, ट्वेंटीफोर सेव्हन, हेड डिजिटल वर्क्स या कंपन्यांचाही समावेश आहे.55 thousand crore tax notice to online gaming companies; Allegation of failure to pay GST on gross income



    गेमिंगच्या एकूण उत्पन्नावरील जीएसटी भरणा थकवल्याचा या कंपन्यांवर आरोप आहे. गेमिंग युनिकॉर्न कंपनी ड्रीम इलेव्हनने 25 हजार कोटी रुपयांचा जीएसटी थकवल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. अप्रत्यक्ष कर भरणा थकवल्याप्रकरणी बजावण्यात आलेली देशातील ही सर्वात मोठी कर नोटीस आहे. या उद्योगांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते आगामी काळात गेमिंग कंपन्यांना 1 लाख कोटी रुपयांपर्यंत नोटीस दिली जाऊ शकते.

    ड्रीम इलेव्हन हायकोर्टात

    नोटीस मिळाल्यानंतर ड्रीम इलेव्हन कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये बंगळुरूची ऑनलाइन गेमिंग कंपनी गेम्स क्राफ्ट टेक्नॉलॉजीला 21 हजार कोटींची कर नोटीस बजावण्यात आली होती. अप्रत्यक्ष कर प्रकरणाच्या इतिहासात एवढ्या प्रचंड रकमेची कर नोटीस पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

    55 thousand crore tax notice to online gaming companies; Allegation of failure to pay GST on gross income

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!