विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता . अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे.50 thousand each to the families of the citizens who died due to corona
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे.
मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.
ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.
50 thousand each to the families of the citizens who died due to corona
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेसचा बंगळुरूमधील भंगारवाला देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार, १७०० कोटींहून अधिक संपत्ती, शिक्षण केवळ पाचवी
- मतांनी नव्हे तर लष्कराच्या पाठिंब्याने इम्रान खान सत्तेवर, नवाझ शरीफ यांना भ्रष्टाराचाच्या जाळ्यात अडकविण्याचाही कट
- WATCH : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हिंगोलीत साकारतेय घनदाट जंगल
- सुप्रिम कोर्ट आदेश पाळत परमबीर सिंहांचे चौकशीत सहकार्य; साडेसहा तास चौकशीत सर्व आरोप फेटाळले!