विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचे पीए आणि समर्थकांनी एका सामजिक कार्यकर्त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांच्या तक्रारीवरून अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएसह 5 जणांवर, तर राजेश्वर उत्तम आरकेंच्या फिर्यादीवरून सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शंकरपेल्लींविरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.5 persons, including Minister Abdul Sattar’s PA, were beaten to death; A case of atrocity has been registered against the victim
महेश शंकरलाल शंकरपेल्ली (रा. शास्त्रीनगर, सिल्लोड) यांनी याप्रकरणी फिर्यादी दिली आहे. बुधवारी तलाठी भुवन कार्यालयात शहरातील सर्व्हे नंबर 92 मधील आव्हान दिलेल्या फेरफारच्या आक्षेपावरील सुनावणी होती. सुनावणी संपल्यानंतर कार्यालयातून बाहेर निघताना शाकेरमियाँ जानी, मंत्री सत्तारांचे पीए बबलू चाऊस, बबलू जब्बार पठाण, शेख अब्दुल बाशीद शेख सादिक व अकील बापू देशमुख (सर्व रा. सिल्लोड) यांच्यासह इतर लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांचे मार्गदर्शनात फौजदार चातुरे करत आहेत.
मारहाण झालेल्याविरुद्धही ॲट्रॉसिटीचा गुन्हा
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरातील राजेश्वर उत्तम आरके (46) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी खासगी कामानिमित्त नवीन तलाठी भुवन कार्यालयाजवळ गेलो असता महेश शंकरपेल्ली यांनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून महेश शंकरपेल्लीविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कोल्हे करत आहेत.
5 persons, including Minister Abdul Sattar’s PA, were beaten to death; A case of atrocity has been registered against the victim
महत्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!
- गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवार पॅनलचा धुव्वा; राष्ट्रवादी फुटीपाठोपाठ संस्थागत राजकारणातही पवारांची मोठी पीछेहाट!!
- भाजपची करा शितावरून भाताची परीक्षा; पण घराणेशाही नेत्यांची घरातल्याच भाकऱ्या फिरवण्याची आहे का क्षमता??
- भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईच्या रुग्णालयात दाखल