• Download App
    houses नागपूरकरांची स्वप्नपूर्ती; आर्थिक दुर्बल‌ घटकांना 480 घरे वाटप; महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण

    नागपूरकरांची स्वप्नपूर्ती; आर्थिक दुर्बल‌ घटकांना 480 घरे वाटप; महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 480 (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) ‘स्वप्न निकेतन’ सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकासकामांचे लोकार्पण केले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चावीचे वाटप केले. या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अधिकारी, तसेच आवास योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

    प्रधानमंत्री आवास योजनेतील निवडक लाभार्थी –

    •  श्रावण कामत
    •  मंजुश्री विजय टेंबुर्णे
    •  राहुल सुरेश बावसकर
    •  अतुल वानखेडे
    •  मुस्ताक अहमद सौदागर
    • नीता चरण उईके

    त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन वाहनांसह विद्युत बसेसचे लोकार्पण केले. यामुळे नागपूर शहरातील आपत्कालीन सेवा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

    480 houses distributed to economically weaker sections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री – प्रशासनात वाद? मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी; शेतकऱ्यांना मदत करण्यावरून वादावादी

    Fadnavis : आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, देवेंद्र फडणवीसांचा टोला; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी नसल्याची दिली माहिती

    Prakash Solanke’ : NCP आमदाराचा कार्यकर्त्यांना सल्ला- निवडणुकीत चपटी, कोंबडं, बकरं द्यावं लागतं; इच्छुक असून उपयोग नाही, खर्चाची तयारी ठेवा