प्रतिनिधी
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर बेमुदत संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली असून अद्याप राज्य सरकारमध्ये परिवहन महामंडळाच्या विलीनीकरणाला मान्यता दिली नसली तरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी 41 टक्के पगारवाढ देण्याचे महाविकास आघाडी सरकारने मान्य केले आहे.41% salary increase for ST employees
गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी ठाण मांडून आहेत. मंगळवारी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची अनिल परब यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत अंतरिम पगारवाढ देण्यात येणार असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यानंतर आज पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत पगारवाढीवर सकारात्मक चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगारवाढ देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार मूळ वेतनाच्या 41 टक्के वाढ करण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गेल्या चौदा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. हायकोर्टाने नेमलेल्या समितीचा निर्णय राज्य सरकारला मान्य आहे. समितीचा अहवाल आल्यावर विलिनीकरणाचा निर्णय घेऊ, असे राज्य परिवहन मंत्री यांनी सांगितले. परंतु समितीचा निर्णय येईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्यात आली आहे. यानुसार, या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसेच साधारणः ज्या कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रूपये पगार असेल, त्यांच्या पगारात वाढ होऊन 17 हजार 500 रूपये मिळतील, असेही त्यांनी सांगितले आहे.
41% salary increase for ST employees
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेसचा कचरा आम्हाला घ्यायचा नाही अन्यथा संध्याकाळपर्यंत २५ आमदार आपमध्ये येतील, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल
- शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शरद पवार नाराज; साताऱ्यात जाऊन घेतली राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाडाझडती!!
- कबीर सिंगच्या यशानंतर शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
- यमुना एक्स्प्रेस वेला अटलबिहारी वाजपेयींचे नाव दिले जाण्याची शक्यता, नामांतर योगी सरकारच्या विचाराधीन