वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या तब्बल 41 मालमत्ता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एका झटक्यात जप्त केल्या आहेत. त्यांच्या 36 मालमत्तांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काहीच दिवसांपूर्वी छापे घातले होते.41 properties of Yashwant Jadhav confiscated from Income Tax Department
गेल्या दोन वर्षात यशवंत जाधव यांनी या सर्व प्रॉपर्टीज खरेदी केल्याचे आढळून आले आहे तसेच या मालमत्तांचे व्यवहार करताना हवाला मार्फत पैसे दिल्याचे लक्षात आले आहे. संबंधित मालमत्तासंबंधीचा हिशेब इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने यशवंत जाधव यांच्याकडे मागितला आहे. हा हिशेब दिला नाही तर येत्या सहा महिन्यांमध्ये या मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे.
राऊतांबद्दल रदबदली, जाधवांवर कारवाई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे मावळते खासदार संजय राऊत यांच्याबद्दल रदबदली केली तरी देखील केंद्रीय तपास संस्थांची कायदेशीर कारवाई थांबलेली नाही हेच यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त करण्यावरून स्पष्ट होत आहे.
यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्री ला दिलेल्या घड्याळाचा आणि 50 लाखांचा उल्लेख आहे तसेच केबलमॅन आणि एम ताई असा उल्लेख आहे. हा केबलमॅन कोण आणि एम ताई कोण या विषयी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हे केबलमॅन सध्या ठाकरे – पवार मंत्रिमंडळात असल्याचे बोलले जात आहे, तर मुंबई महापालिकेत होत्या अशीही चर्चा आहे.
पण आता चर्चेच्या पलिकडे जाऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त केल्या आहेत.