मुंबई : बीएमसी, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या ४० मालमत्ता आयकर विभागाकडून (Income Tax) तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय जाधव यांचा वांद्रे भागातील पाच कोटी रुपयांचा फ्लॅटही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भायखळ्यात २६ फ्लॅट्सवर जप्तीची कारवाई झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला हा हादरा मानला जात आहे. 40 properties of Shiv Sena corporator confiscated from ‘IT’
यशवंत जाधव यांच्या मालकीच्या काही मालमत्ता नातेवाईकांच्या माध्यमातून चालवल्या जात होत्या. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यशवंत यांचे पुतणे विनित जाधव आणि मोहिते नावाच्या नातेवाईकालाही समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
आधी यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये रोकड आणि ५० लाख रुपये किमतीचे घड्याळ दिल्याचा उल्लेख होता, तर त्यानंतर ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ अशा दोन व्यक्तींसोबत एक कोटी ७५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचेही समोर आले होते. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जाधव दाम्पत्यासाठी हा धक्का बसला.
40 properties of Shiv Sena corporator confiscated from ‘IT’
महत्त्वाच्या बातम्या
- काळा पैसा मिळवायचा, कारवाई झाली की बोंबलायचं आणि पाप झाकण्यासाठी शक्तीप्रदर्शन करायचे, नारायण राणे यांची संजय राऊतांवर टीका
- कॉँग्रेसचा डाव शिवसेना उधळणार, कोल्हापूर उत्तरमध्ये दुसरे मंगळवेढा घडणार!
- संरक्षणात आत्मनिर्भरता, हेलिकॉप्टरपासून तोफखान्यासह १०५ शस्त्रात्रे भारतातच बनणार, शत्रुराष्ट्र सुरक्षा यंत्रणेत घुसखोरी