प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार शिंदे – फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. बोर्डीकरांनी शरद पवारांच्या 40 वर्षांच्या सत्तेचा इतिहासच बाहेर काढला आहे.40 days, what did Pawar do for the Maratha community in 40 years??; MLA Meghna Bordikar’s question to MP Supriya Sule!!
आम्हाला 40 दिवसांत काय केले??, असा प्रश्न विचारता, मग तुमच्या वडिलांनी 40 वर्षात मराठा समाजासाठी काय केले??, याचे उत्तर द्याल का??, असा बोचरा सवाल मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांना केला आहे.
मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची घरे जाळली गेली. या मुद्द्यावर संतप्त होऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला. या मुद्द्यावरही मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
मेघना बोर्डीकर म्हणाल्या :
आमच्या सरकारने मराठा आरक्षण साठी 40 दिवसांमध्ये काय केले असा सवाल सुप्रिया सुळे विचारतात पण 1980 सालापासून मराठा समाज आरक्षण मागतो आहे. तेव्हापासून आपले वडील शरद पवार यांना मराठा समाजाने डोक्यावर घेतले. आपल्या वडिलांना आणि आपल्या घराण्याला सत्ता दिली, मग गेल्या 40 वर्षांमध्ये आपण मराठा समाजासाठी काय केले??, हे मी मराठा समाजाची मुलगी म्हणून आपल्याला विचारते आहे. 40 वर्षांत तुम्ही मराठा समाजासाठी काम केले असते, तर आज माझ्या तरुण मराठा बांधवाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती.*
मनोज जरांगे पाटलांचे उपकार माना त्यांनी मराठा समाजाला जागे केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात मराठा समाजाला 16 % आरक्षण दिले होते. ते हायकोर्टापर्यंत टिकवून दाखवले होते, पण त्यानंतर तुमचे वडील शरद पवार यांच्या “कृपेने” महाराष्ट्रावर लादलेले सरकार आले. त्या ठाकरे – पवार सरकारच्या नाकर्तेपणामुळे हायकोर्टात टिकलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. तेव्हा सुप्रियाताई, तुम्ही का मूग गळून गप्प बसला होता??, या प्रश्नाचे उत्तर मराठा समाज मागतो आहे.
सुप्रियाताई, आज तुम्ही मराठा आरक्षणासाठी कळवळा आणलाय, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी शिवरायांसमोर शपथ घेतली आहे. त्यामुळे ते मराठा समाजाला आरक्षण देतीलच. आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार असलो तरी सरकारला मराठा आरक्षणावर जाब विचारतच राहू, पण तुम्ही मराठा समाजाच्या तरुणांना भडकवायचे काम करू नये, ते आम्ही सहन करणार नाही.
40 days, what did Pawar do for the Maratha community in 40 years??; MLA Meghna Bordikar’s question to MP Supriya Sule!!
महत्वाच्या बातम्या
- नारायण मूर्ती आठवड्यातून 80-90 तास काम करतात; पत्नी सुधा मूर्ती म्हणाल्या- त्यांचा खऱ्या मेहनतीवर विश्वास
- सीआयडीने चंद्राबाबू नायडूंविरुद्ध चौथा गुन्हा दाखल केला; बेकायदेशीर दारू दुकानांना परवाने वितरीत केल्याचा आरोप
- सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला; मद्य घोटाळ्यात 383 कोटींचे व्यवहार, 8 महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे आदेश
- Maratha Reservation News : जाळपोळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची जरांगेंशी फोनवरून चर्चा जरांगे आजपासून पाणी पिणार!!