विशेष प्रतिनिधी
नागपूर : Nagpur Anganwadi एक 4 वर्षीय चिमुरडा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे रात्रभर वर्गखोलीतच कुलुपबंद अवस्थेत अडकल्याची भयंकर बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्याचा कसून शोध घेण्यात आला. अखेर पोलिसांच्या सूचनेनुसार, शाळेचे कुलूप उघडण्यात आल्यानंतर हा मुलगा अंगणवाडीतच भीतीने थरथरत बसल्याचे दिसून आले. या घटनेमुळे पालकवर्गात एकच खळबळ माजली आहे.Nagpur Anganwadi
यासंबंधीच्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बोरकर लेआऊट परिसरातील अंगणवाडीत ही घटना घडली आहे. हा 4 वर्षीय चिमुकला बुधवारी दुपारी अंगणवाडीत गेला होता. तिथे खेळता खेळता तो बाजूच्या खोलीत गेला होता. त्यानंतर तो तिथेच झोपी गेला. सायंकाळी शाळा सुटल्यानतंर कर्मचाऱ्याने बाजूच्या खोलीची तपासणी न करता शाळेला बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर मुलगा घरी परत न आल्यामुळे त्याच्या पालकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण तो कुठेच सापडला नाही.Nagpur Anganwadi
अखेर स्थानिकांनी त्याचे अपहरण झाल्याची भीती व्यक्त केली. त्यावर पालकांनी तत्काळ खापरखेडा पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त संदीप पखाले यांच्या नेतृत्वात मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 7 पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी रात्रभर परिसरातील सीसीटीव्ही तपासून मुलाचा शोध घेतला. एवढेच नाही तर आसपासचे तलाव व नालेही पिंजून काढले. पण मुलाचा कोणताच शोध लागत नव्हता. हे पाहून आई-वडिलांची बैचेनावस्था वाढत होती. ते चिंतेत पडले होते.
शाळेचे कुलूप उघडले अन्…
पोलिसांनी रात्रभर शोध घेतल्यानंतर शोध थांबवला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ते आपल्या कामाला लागले. अखेर पोलिस उपायुक्त संदीप पखाले यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन अंगणवाडीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संबंधितांना अंगणवाडीचे कुलूप उघडण्याचे निर्देश दिले. कुलूप उघडताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मुलगा शाळेतच सुरक्षित बसलेला होता. रात्रभर एकटाच अंधारात बसल्यामुळे तो भीतीने थरथर कापत होता. त्यामुळे आपल्या आईला पाहताच त्याने तिला मिठी मारून हंबरडा फोडला. हे चित्र पाहून सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
या घटनेनंतर पोलिसांनी शाळा व अंगणवाडी प्रशासनाला चांगलेच खडेबोल सुनावले. शाळा बंद करताना किंवा कुलूप लावताना प्रत्येक खोलीची कसून तपासणी करण्याची तंबी त्यांना दिली. तसेच अशा प्रकारचा हलगर्जीपणा पुन्हा घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, पालकवर्गातून या घटनेवर चिंता व्यक्त केली जात आहे.
4-Year-Old Boy Locked Overnight in Nagpur Anganwadi Due to Staff Negligence
महत्वाच्या बातम्या
- AI फॉर एग्रीकल्चर वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा AI इंडिया समिटमध्ये विशेष संवाद!!; महाराष्ट्राचे मॉडेल स्वीकारले संपूर्ण देशाने!!
- DGCA : विमानात गोंधळ घातल्यास 30 दिवसांची बंदी लागेल; DGCAची सूचना
- राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!; फडणवीसांनी मारली पाचर
- महाराष्ट्रातल्या राजकीय धबडग्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र दिल्लीतल्या AI समिटमध्ये मुशाफिरी; महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण करार आणि घोषणा