• Download App
    4 Sadhus beaten up in Sangli: Fadnavis calls Director General of Police from Russia

    सांगलीत 4 साधूंना मारहाण : फडणवीसांचा रशियातून पोलीस महासंचालकांना फोन; मागविला रिपोर्ट!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात मुले पळविणाऱ्यांची टोळी आली आहे, अशी अफवा पसरवल्यानंतर चार साधूंना जमावाने मारहाण केली. पालघर मधल्या साधूंच्या हत्याकांडाचा प्रसंग होता होता वाचला. महाराष्ट्रभर या प्रकरणाची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रशियाची राजधानी मॉस्को मधून महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना फोन करून साधु मारहाण प्रकरणाचा रिपोर्ट मागविला आहे. 4 Sadhus beaten up in Sangli: Fadnavis calls Director General of Police from Russia

    सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये जमावाने चार साधूंना मारहाण केली. हे साधू बिहार मधून पंढरपूरच्या यात्रेला आले होते. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून जात असताना मुले पळवणारी टोळी आली आहे, अशी अफवा पसरली आणि या अफवेतून चार साधूंना जमावाने मारहाण केली. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. साधुंनी कोणतीही तक्रार उमदी पोलीस ठाण्यात दाखल केली नव्हती. पण संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी त्याची दखल घेतली. काही तासानंतर सहा जणांना अटकही केली.

    महाराष्ट्रात या घटनेचे मोठे पडसाद उमटले. भाजप आणि शिवसेना नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. या विषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रशियाची राजधानी मॉस्को मधून महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना फोन केला आणि संबंधित घटनेचा रिपोर्ट मागून घेतला. देवेंद्र फडणवीस हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी मॉस्को विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. त्यांच्या समवेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि माजी खासदार विनय सहस्रबुद्धे हे देखील आहेत.

    4 Sadhus beaten up in Sangli: Fadnavis calls Director General of Police from Russia

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य