विशेष प्रतिनिधी
नागपूर : येथे शनिवारी अवघ्या 4 तासांत 4 इंच म्हणजेच 100 मिमी पाऊस झाला. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे शहरात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरेंद्रगडमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या घरात पाणी शिरले होते. अर्धांगवायूमुळे तिला चालता येत नव्हते. रेस्क्यू टीमला सकाळी महिलेचा मृतदेह सापडला. याशिवाय आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 4 inches of rain in Nagpur in 4 hours; Four dead including woman
गिट्टी खदान परिसरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या घरातही पाणी शिरले होते. पंचशील चौकाजवळील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मेडिकल कॉलेजमधील खड्ड्यात चहा विक्रेत्याचा मृतदेह आढळून आला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर सांगितले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत सुमारे 500 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मूकबधिर मुलांच्या शाळेतून 70 मुलांची सुटका करण्यात आली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराच्या दोन तुकड्याही दाखल झाल्या आहेत.
तात्पुरत्या शिबिरांमध्ये राहणाऱ्यांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूही दिल्या जात आहेत. शाळा, महाविद्यालये बंद राहिली. हवामान खात्याने रविवारसाठी ऑरेंज अलर्टही जारी केला आहे.
पावसामुळे नागपूर रेल्वे स्थानकात 3 ते 4 फूट पाणी तुंबले होते. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेचे म्हणणे आहे की, हे संकट असूनही गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. एकही ट्रेन रद्द केली नाही.
4 inches of rain in Nagpur in 4 hours; Four dead including woman
महत्वाच्या बातम्या
- नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, शाळांना सुटी जाहीर; अंबाझरीसह गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने घरांमध्ये शिरले पाणी
- JDS एनडीएत सहभागी; अमित शहांना भेटल्यानंतर कुमारस्वामींची घोषणा, म्हणाले- आमची कोणतीही मागणी नाही
- लालू, राबडी, तेजस्वीसह 17 जणांना समन्स; लँड फॉर जॉब्स प्रकरणात 4 ऑक्टोबरला हजर राहावे लागणार
- बिधूडीने फिजूल हुसका दी है मक्खी; उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपाला ढकलले I.N.D.I आघाडीत!!