विशेष प्रतिनिधी
जळगाव: जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास जळगावमध्ये थंडी वाढली. त्याचा हा परिणाम होता.4 died due to cold weather in Jalgaon
तापमानाचा पारा ७.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. मृत चौघेही निराधार आणि बेघर होते. ते रस्त्याकडेला झोपले होते. थंडगार वारे आणि अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरात भीक मागून उदरनिर्वाह करत होते. विविध ठिकाणी ते मृतावस्थेत आढळले.
मृत व्यक्ती नेमके कोण? याची माहिती पोलिसांना मिळाली नाही.ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली
यामध्ये एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौकात, दुसऱ्याचा निमखेडी रस्त्यावर तर तिसऱ्याचा रेल्वे स्थानक परिसरात आढळला आहे. तसेच चौथ्या व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला आहे.
4 died due to cold weather in Jalgaon
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युट्युबवर १ कोटी सब्सक्रायबर : जगातील नेत्यांमध्ये पहिला नंबर
- ई.एस.आय.सी.च्या रूग्णालयात डॉक्टर्स, नर्सेसची तातडीने भरती मंत्री राजेश टोपे यांची माहिती
- हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांची भरती १५ आघाडीच्या युद्धनौकांवर आता २८ महिला अधिकारी
- महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे विश्लेषण सत्र