• Download App
    लोणावळ्याजवळ पाठलाग करत कारमधून 4 कोटींची रोकड जप्त; चालकाला अटक, पण रकमेचा "गब्बर" मालक कोण??|4 crore cash seized from car chasing near Lonavla; Driver arrested, but who owns the "gabbar" of money

    लोणावळ्याजवळ पाठलाग करत कारमधून 4 कोटींची रोकड जप्त; चालकाला अटक, पण रकमेचा “गब्बर” मालक कोण??

    प्रतिनिधी

    मुंबई : पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या स्विफ्ट कारचा पाठलाग करत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तब्बल 4 कोटी रूपयांची रोकड ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी कारचालक महेश नाना माने, विकास संभाजी घाडगे या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पण एवढ्या मोठ्या रकमेचा नेमका मालक कोण?, याचा शोध अद्याप पोलिसांना लागलेले नाही. चालकाकडून ही माहिती घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे परंतु तो काही सांगायला तयार नाही. या प्रकरणात हवाला रॅकेट गुंतल्याच्या संशयातून पोलिस पुढचा तपास करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.4 crore cash seized from car chasing near Lonavla; Driver arrested, but who owns the “gabbar” of money

    मुंबईहून पुण्याच्या दिशेने अज्ञात वाहनातून शस्त्र आणि पैसे घेऊन जाणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसाचं एक पथक तपास करत होते. यावेळी KA-53-MB-8508 मारुती स्विफ्ट ही गाडी भरधाव पुण्याच्या दिशेने येत होती. पोलिसांनी या गाडीस हात दाखवून थांबवण्यास सांगितले.



    मात्र चालकाने गाडी थांबवली नाही. मग पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गाडीला थांबवले. यावेळी गाडीची तपासणी केली असता चोर कप्प्यात तब्बल 4 कोटी रुपये पोलिसांना आढळले. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देण्यात आली असून पुढील कारवाई करत आहेत. ही कारवाई लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

    या प्रकरणी मोटार चालक महेश माने, विकास घाडगे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. एवढी मोठी रक्कम कुठून कुठे व कोणत्या कारणासाठी नेण्यात येत होती. आवश्यक कागदपत्रे, वाहतुक परवाना याबाबत समाधानकारक माहिती या दोघांना पोलिसांनी दिली नाही. या प्रकरणातील हवाला रॅकेटचा तपास करत आहेत.

    4 crore cash seized from car chasing near Lonavla; Driver arrested, but who owns the “gabbar” of money

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस