वृत्तसंस्था/ प्रतिनिधी
जालना : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जालन्यात फुल टू फिल्मी स्टाईल छापा मारला आणि अधिकाऱ्यांना तब्बल 390 कोटींचे घबाड गावले… भले इन्कम टॅक्सने छापे स्टील उद्योग, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांवर घातले असतील आता हा पैसा नेमका कोणा बड्यांचा आहे?? उत्तर प्रदेशात मेरठमध्ये घातलेल्या अत्तर व्यावसायिकांच्या छाप्यासारखाचा तर हा छापा नाही ना??, असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले आहेत. 390 crores in income tax in jalna
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये अत्तर व्यावसायिकांकडे समाजवादी पार्टीच्या बड्या नेत्यांचा पैसा सापडला होता… मग जालन्यात इन्कम टॅक्स छाप्यात सापडलेला पैसा नेमका कोणाचा??, असा सवाल तयार झाला आहे.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मोठी कारवाई करताना एकदम फिल्मी स्टाईलने छापे घातले. स्टील उद्योग, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांवर छापा मारला. यावेळी मोठी युक्ती लढवत अधिकारी चक्क लग्न वऱ्हाडी झाले आणि त्यांनी छापे घातले. यावेळी त्यांच्याबरोबर 200 गाड्यांचा ताफा होता. त्यामुळे सुरुवातीला कोणालाच शंका आली नाही. या धाडीत आयकर विभागाकडून 390 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आले.
लग्नाचे स्टिकर्स लावून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या 200 गाड्या संभाजीनगरात दाखल झाल्या. जालन्यातील इन्कम टॅक्सचे संभाजीनगर कनेक्शन समोर आले. संभाजीनगरमधील एक केटरर आणि एका बिल्डरची चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरांवर, कार्यालयांवर तसेच इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने छापा घातले. या छाप्यांमध्ये जवळपास 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली.
या छापेमारीतच काही दस्तावेज, 32 किलो सोने, 58 कोटी रुपयांची रोख रक्कम अशी एकूण 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. 3 ऑगस्टला ही छापेमारी करण्यात आली.
असा टाकला छापा
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अधिकारी लग्न सोहळ्याचे स्टिकर लावलेल्या गाड्यांमधून छापा टाकण्यासाठी आले होते. या गाड्यांवर राहुल आणि अंजली… दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकर लावले होते. जवळपास 200 गाड्यांमधून 480 अधिकारी कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. सुरुवातीला जालनावासीयांना यासंदर्भात काहीही समजलं नाही. कुणाच्या तरी कार्यक्रमासाठी या गाड्या आल्या असाव्यात असं वाटत होते. त्यामुळे छाप्याची कुणाला शंका आली नाही.
मात्र काही वेळात हे वऱ्हाडी नव्हे, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकार आहेत हे लक्षात आले परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही कारण हे अधिकारी पूर्ण तयारी निशी आले होते आणि त्यांनी छापील सुरूही केले होते त्यामुळे संबंधितांना फारशा “वरच्या” हालचाली करता आल्या नाहीत. फोनाफोनी करून हे छापे रोखता आले नाहीत.
390 crores in income tax in jalna
महत्वाच्या बातम्या
- हर घर तिरंगा मोहिमेवर वरुण गांधींचे सरकारवर टीकास्त्र ; म्हणाले- तिरंग्याच्या किमतीवर गरिबांच्या तोंडचा घास हिरावणे लज्जास्पद
- जगात शांततेसाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव : मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले- युद्ध रोखण्यासाठी आयोग बनवावा, यात पोप फ्रान्सिसही असावेत
- पावसाळी अधिवेशनात सहा दिवस कामकाज, अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरुवात
- Azadi Ka Amrit Mahostav : स्वतंत्र भारताला अर्थमंत्री आणि कायदे पंडित शिक्षणमंत्री देणारे लोकमान्य टिळक!!