विशेष प्रतिनिधी
पुणे : चित्रपट आणि मालिकांच्या वाढत्या प्रभावामुळे आजकालचे बरेच तरुण तरुणी मालिकांमध्ये काम करून किंवा चित्रपटांमध्ये काम करून प्रसिद्ध होण्यासाठी बराच संघर्ष करताना दिसून येतात. पण हा संघर्ष दरवेळेस त्यांना यश मिळवून देईल असे नाही. बऱ्याच लोकांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. तर काही लोकांना लवकर संधीदेखील मिळते.
31-year-old girl raped in Pune for two years in a row
नुकताच पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये एक घटना घडली आहे. एका शॉर्ट फिल्म निर्मात्याने एका तरूणीला सीरियलमध्ये आणि सिनेमामध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर सलग दोन वर्ष बलात्कार केला. अशा घटना याआधीही घडल्या आहेत आणि त्या अजूनही सुरूच आहेत.
समीर वाळू निकम असं गुन्हाच दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. समीर हा यूट्यूब चॅनलवर शॉर्टफिल्म्स बनवतो. त्याने यूट्यूबवर काही शॉर्ट फिल्म्स आणि गाणी देखील बनवली आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याची आणि संबंधित पीडित महिलेची(वय 31) ओळख झाली होती. पुढे त्या दोघांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. आणि त्याने तिला कामाचे आमिष दाखवून सलग दोन वर्षे तिच्यावर बलात्कार केला अशी तक्रार पीडितेने कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करणार आहेत.
31-year-old girl raped in Pune for two years in a row
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे सीव्हीसी- सीबीआयच्या संयुक्त परिषदेला संबोधन, म्हणाले, देशाला लुटणारे कितीही शक्तिशाली असले तरी आमचे सरकार त्यांना सोडत नाही!
- तामिळनाडू सरकार मंदिरांमधील 2000 किलो सोने वितळवण्याच्या तयारीत, हिंदू संघटनांचा विरोध, उच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका
- Punjab Congress : मुख्यमंत्री चन्नी यांचे नवजोत सिद्धू यांना आव्हान, मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी, म्हणाले – दोन महिने मुख्यमंत्री होऊन काम करून दाखवा!
- शिवसेना खा. भावना गवळी आजही ईडीपुढे हजर होणार नाहीत, चिकुनगुनियाचे कारण देत 15 दिवसांची मागितली मुदत
- Aryan Khan Drugs Case : एनसीबीच्या हाती ड्रग्जशी संबंधित आर्यनच्या चॅट्स, पार्टीच्या आधीही एका बड्या अभिनेत्रीशी चॅटिंग