• Download App
    प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीपाशी आणखी 3 कबरी; अतिक्रमण की आणखी काही? शोध सुरू 3 more graves found near afzal khan grave at pratap gad

    प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीपाशी आणखी 3 कबरी; अतिक्रमण की आणखी काही? शोध सुरू

    प्रतिनिधी

    सातारा : प्रतापगडच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी ऐतिहासिक काळातले आहेत की ते अतिक्रमण आहे?, या कबरी नेमक्या कोणाच्या आहेत? हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 3 more graves found near afzal khan grave at pratap gad

    मात्र अफजलखानाच्या कबड्डी शेजारी आणखी तीन कबरी असल्याच्या बातमीला साता-याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. सध्या या कबरी नक्की कोणाच्या याबाबत माहिती काढण्याचे काम महसूल विभागाचे अधिकारी करीत आहेत.


    शिवप्रतापदिनी अफजल खानाच्या कबरीजवळच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; परिसरात कलम 144 लागू


    प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम महसूल विभाग आणि वनविभागाने बुलडोझर लावून पाडले. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधून ही कारवाई केली.

    2006 सालापासून हा परिसर सील

    हिंदुत्ववादी संघटनांनी अफझल खानाच्या कबरीजवळ असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी केली होती. तसेच, शिवप्रेमींकडून वारंवार मागणी होत असल्याने, अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. त्या परिसरात कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.

    3 more graves found near afzal khan grave at pratap gad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra government : महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण धोरण जाहीर : विद्यार्थी, ज्येष्ठांच्या गृहप्रकल्पांना मुद्रांक, एफएसआयमध्ये सवलत

    Vijaykumar Ghadge : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे थेट अजित पवारांना विचारणार जाब; “माझं चुकलंच काय?” असा सवाल करत मुंबईकडे प्रस्थान

    Girish Mahajan : “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल