• Download App
    उसाच्या ट्रॉलीने केला घात; तीन जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू; अहमदनगरमध्ये कारची धडक। 3 friends died on the spot

    उसाच्या ट्रॉलीने केला घात; तीन जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू; अहमदनगरमध्ये कारची धडक

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघातात भरधाव कारने उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या तीन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. 3 friends died on the spot

    उसाच्या ट्रॉलीला पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात घडला आहे.राहुल सुरेश आळेकर (वय २२ रा. श्रीगोंदा),  केशव सायकर (वय २२ रा. काष्टी) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८ रा. श्रीगोंदा), अशी त्या तीन मित्रांची नावं आहेत.

    मृत राहुल आणि आकाश हे दोघं आपला मित्र केशव सायकर याला त्याच्या गावी काष्टी याठिकाणी सोडवण्यासाठी जात होते. रात्री एकच्या सुमारास हॉटेल अनन्यासमोरून जात असताना चालकाला समोर असणाऱ्या ट्रॉलीचा अंदाज आला नाही.



    तसेच कारचा वेगही अधिक असल्याने कारची उसाच्या ट्रॉलीस पाठीमागून जोरदार धडक बसली आहे. हा अपघात इतका भीषण होता, की या अपघातात कारमधील तिघेही जागीच ठार झाले आहेत. तसेच कारचा अक्षरशा चक्काचूर झाला आहे.

    3 friends died on the spot

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा